गोरेगाव येथील बाळाजी सहादू तांबे यांचे निधन

पारनेर प्रतिनिधी
गोरेगाव येथील शेतकरी बाळाजी सहादू तांबे (वय वर्ष ८०) यांचे बुधवार दिनांक २८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११.३० वा. अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी गंगुबाई बाळाजी तांबे दोन मुले श्री बापूसाहेब बाळाजी तांबे सर व संतोष बाळाजी तांबे आहेत
कै. बाळाजी तांबे यांचे जीवन अतिशय कष्टमय परिस्थितीत गेले. लहानपणापासून घरची परिस्थिती नाजूक सात भाऊ व एक बहीण असा मोठा परिवार होता. अगदी कमी वयात कुटुंबाच्या शेतीची सर्व जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. रोज काबाडकष्ट करणे ठरलेले, परंतु त्यांनी दोन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले मोठा मुलगा बापूसाहेब तांबे एम.ए. बीएड असून रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरी करत आहे. त्यांचा दुसरा मुलगा संतोष तांबे तालुक्यातील पतसंस्था पारनेर ग्रामीण पतसंस्थेमध्ये वरिष्ठ शाखा अधिकारी पदावर काम करत आहे. स्वतः शिकलेले नसले तरी त्यांनी कुटुंबाला दिशा दिली.