इतर
जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठाणचे “समाजरत्न पुरस्कार” जाहीर

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील भानसहिवरे येथील जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने मातोश्री स्व.सौ.द्वारकाबाई मारूतराव मोहिटे पाटील यांचे स्म्रुतीप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या सन २०२२च्या "समाजरत्न पुरस्कारांची"घोषणा नुकतीच जाणता राजा प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आल्याची माहीती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव मोहिटे यांनी दिली आहे. समाजात विविध क्षेत्रात दिशादर्शक व समाजोपयोगी कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी जाणता राजा प्रतिष्ठाणच्या वतीने मातोश्री स्व.सौ द्वारकाबाई मारूतराव मोहिटे यांचे स्मरनार्थ "समाजरत्न"पुरस्कार देण्यात येतात.या वर्षी सन२०२२ च्या पुरस्कारासाठी निवड समितीने विविध क्षेत्रातील नऊ नावांची घोषणा केली आहे.यामध्ये डाँ.जगन्नाथ नरवडे (आरोग्य सेवा)भानसहिवरा येथील जेष्ठ वैदय,कुमार गर्जे (क्रुषी क्षेत्र)क्रुषी सहाय्यक, कैलास शिंदे (कर्षी क्षेत्र) प्रयोगशिल क्रुषी उदयोजक करजगाव, अशोक पेहरेकर व सौ रंजना पेहरकर (आदर्श माता-पिता)प्रतिकुल परिस्थितही मुलींना उच्च शिक्षण देणारे दांपत्य,श्रीमती नीता आनंदकर (शिक्षण क्षेत्र)उपक्रमशिल शिक्षिका जि.प.शाळा काळे वस्ती,श्रीमती वर्षा शेटे-ठाणगे (शिक्षण क्षेत्र)आदर्श शिक्षिका केंद्र शाळा.भानसहिवरे,श्री फयाज शेख (शिक्षण क्षेत्र)गुणवंत शिक्षक उर्दु शाळा सलाबतपुर,श्री शिवाजी सोनवणे (पशुआरोग्य सेवा)व्रणोपचारक नेवासा व श्री शरद चेचर (लोकसेवा क्षेत्र)उप कार्यकारी अभियंता महावितरण,नेवासा.श्रीमती मनिषा धानापुणे(क्रिडा क्षेत्र)राज्य कबड्डी पंच,जि.प. शाळा भेंडा खुर्द, शहाराम आगळे (पत्रकारीता) शेवगाव आदिंचा समावेश करण्यात आला आहे.पुरस्कारांचे लवकरच प्रमुख मान्यवरांचे हस्ते वितरण होणार असल्याची माहीती प्रतिष्ठानच्या वतीने लक्ष्मणराव मोहिटे यांचेसह मानव साळवे,आरिफ शेख,चांगदेव दारुंटे यांनी दिली आहे.