इतर

पिंपळगाव तुर्कचा भूमिपुत्र भानुदास शिंदे ची विज्ञान प्रदर्शनात बाजी!

आमदार लंके यांनी केले शिंदे यांचे कौतुक

पारनेर प्रतिनिधी :
महाराष्ट्राच्या शैक्षणीक क्षेत्राला नवीन दिशा देण्यात व संपुर्ण राज्याला शिक्षक पुरवनारा तालुका म्हणून नेहमीच अग्रभागी समजला जानारा असी पारनेर तालुक्याची ओळख राज्याला झाली आहे .
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था नागपूर यांच्या आदेशान्वये गणित व पर्यावरण या विषयावर 49 वे वार्ड व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन,शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभाग यांनी आयोजित केले होते. सदर विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय तंत्रज्ञान आणि खेळणी असा होता. मुंबई मधील मुलुंड येथील वामनराव मुरांजन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयचे भानुदास शिंदे यांनी वैज्ञानिक साधनांच्या संकल्पनेतून वर्तुळाची संकल्पना हे मॉडेल या विज्ञान प्रदर्शनात सादर केले.


वर्तुळाची संकल्पना या शैक्षणिक साहित्याच्या मॉडेलने विद्यार्थ्यांना त्रिज्या व्यास व परीघ सहज सोप्या पद्धतीने कशा प्रकारे शिकवता येईल याचे सादरीकरण भानुदास शिंदे यांनी करून अनेकांचं लक्ष वेधून घेतले. त्यामुळे नाविन्यपूर्ण गणला केलेला हा प्रकल्प उत्कृष्ट वैज्ञानिक साधन म्हणून या प्रदर्शनात निवडला गेला व त्यास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक घोषित करण्यात आले.
या गुणी व बुद्धीवादी शिक्षकाचे पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादिचे आमदार निलेश लंके यांनी कौतुक करत . शैक्षणीक क्षेत्रात या पुढील काळातही नावण्यपुर्ण योगदान द्या आशा प्रकारे शुभेच्छा दिल्या !
शिक्षण निरीक्षक उर्मिला पारधे यांचे हस्ते तृतीय क्रमांकाचे पारितोषिक म्हणून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन शिंदे यांना गौरविण्यात आले.

शिक्षण उपनिरीक्षक संतोष कंठे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गजेंद्र बनसोडे, समूह साधन व्यक्ती उदयकुमार शिंदे, प्रतिभा शिंदे, मुख्य निमंत्रक व सहनिमंत्रक उपस्थित होते. मुलुंडच्या वामनराव मुरांजन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयच्या भानुदास शिंदे यांच्या उत्कृष्ट अशा या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच अनेक पारनेरकरांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक करत श्री . शिंदे सर यांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button