ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालयात कला मंडळाचे उद्घाटन संपन्न

राजूर प्रतिनिधी
येथील ॲड.एम. एन.देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राजूर, ता. अकोले या महाविद्यालयातील कला मंडळ विभागाच्या वतीने शिवशाहीर प्रा. मुकुंद भोर यांच्या शुभहस्ते कला मंडळाचे उद्घाटन संपन्न झाले
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.वाय.देशमुख हे उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उद्घाटक व व्याख्याते शिवशाहीर प्रा मुकुंद भोर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नटराजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शिवशाहीर मुकुंद भोर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील,क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या जीवन कार्यावर आधारित पोवाडे सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. या सादरीकरणासाठी त्यांचे पिताश्री डॉ. दगडू भोर, बंधू शिवराज यांनी त्यांना उत्तम साथ दिली तसेच श्री. किशोर देशमुख यांनी उत्कृष्ट ढोलकी वादन व प्रा अतुल शाळिग्राम यांनी उत्तम हार्मोनियम वादन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. शाहीर भोर यांनी सादर केलेले पोवाडे,शेतकरी गीते, व लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या गीतांना विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कला मंडळाचे सदस्य प्रा. डॉ.आर.डी नन्नवरे यांनी केले प्रा.एस.बी शिंदे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.वाय.देशमुख यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.
प्रा.व्ही.बी.येलमामे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले प्रा.डी.व्ही.धोक्रट यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.