महाराष्ट्राच्या लालपरीला ७५ वर्षे पुर्ण

एस -टीचा अमृत महोत्सव पारनेर आगारात साजरा !
दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :
१ जुन १९४८ साली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस अहमदनगर जिल्ह्यातूनच अहमदनगरचे रहिवासी कै.लक्ष्मणराव केवटे हे वाहक असनारी पहिली बस नगर – पुणे मार्गावर धावली. या घटनेला आज 75 वर्षे पूर्ण झाल्याकारणाने एसटी महामंडळाच्या अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आज संपूर्ण राज्यात साजरा होत आहे .राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये एकाच वेळी अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आसताना , पारनेर आगारातही आमदार नीलेश लंके यांचे जेष्ठ बंधू दिपकअण्णा लंकेे मा.सभापती सुदाम पवार व बाजार समितीचे नवनिर्वाचित उपसभापती बापूसाहेब शिर्के यांच्या हस्ते सुशोभित केलेल्या पारनेर-मुंबई एसटीचे पूजन करण्यात आले.
पारनेर आगारात यशस्वीरित्या सेवा देणारे निवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्त चालक बलभीम कुबडे व आगाराचे अधिकारी पदाधिकारी व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या छोट्याखानी कार्यक्रमात पारनेर आगाराचे व्यवस्थापक अमोल कोतकर,पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक माजी अध्यक्ष संजय वाघमारे,स्थानक प्रमुख रावसाहेब करपे,वाहतूक निरीक्षक ऋषिकेश सोनवणे,मा.सरपंच बाळासाहेब मते,मा.सरपंच बाळासाहेब नगरे, बबनदादा चौरे , शिक्षक नेते रा. या.औटी ,शिक्षक बॅंकेचे निवृत्त शाखाधिकारी संजय देशमुख,संदीप चौधरी,श्रीकांत चौरे ,रविद्र राजदेव ,पिंटु वाळेकर ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष वसीम राजे, बाळासाहेब पठारे , निवृत्त कर्मचाऱ्यांचे नेते बलभीम कुबडे,वाहतूक नियंत्रक राजेंद्र गायकवाड, चालक दत्ता कोरडे , गणेश चौधरी ,अशोक पुजारी,सागर लोंढे आदी या वेळी उपस्थित होते.
:
एसटीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त एसटीचे अधिकारी, कर्मचारी,प्रवाशांना सुखकर व सुरक्षित सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाचे सर्व चालक वाहक व कर्मचारी वृंद हे नेहमीच कार्यतत्पर असतात.आजचा अमृत महोत्सव वर्ष साजरा होत असताना प्रवाशांना वेगवेगळ्या सवलती व योजनांचा लाभ देत महाराष्ट्राची ही लालपरीची शताब्दी साजरी व्हावी व महाराष्ट्राच्या या जीवन वाहिनीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची दैनंदिन जीवनवाहिनी ही आधुनिक युगातील काळाबरोबर बदलत या लालपरिची शताब्दी साजरी होवो याच शुभेच्छा !
श्री.दिपक (आण्णा ) लंके)
:
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना 75 वर्षांपैकी 35 वर्ष या लालपरीच्या माध्यमातून प्रवाशांची सेवा करण्याची संधी मला मिळाली.एसटी महामंडळाचे अनेक वाईट दिवस मी सेवेत असताना जवळून पाहिले आहेत परंतु सध्या एसटी महामंडळाला चांगले दिवस आले आहेत. त्याचा मला अभिमान वाटतो. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी या महामंडळात सेवा दिली ते महामंडळाचे पहिले वाहक म्हणून ज्यांनी सुरक्षित कामगिरी केली ते कै.लक्ष्मणराव केवटे यांनी नगर -पुणे मार्गावर पहिल्या बसचे सारस्थ केले त्या वाहकांचे गेल्या १७ मे रोजी ९९ व्या वर्षी निधन झाले. त्याच्या तोडून कायम एक वाक्य असायचे की,महामंडळाने माझ्या सारखे शतकमहोत्सव पूर्ण करावे व त्यांच्या शब्दपुर्ती साठी ते शताब्दी वर्ष पूर्ण व्हावे हीच शुभेच्छा .श्री.बलभीम कुबडे
( एसटी निवृत्त कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष )