सर्जेराव पाखरे राज्यस्तरीय आयडियल टीचर गुणरत्न पुरस्काराने सन्मानित!

अशोक आव्हाड
पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील पूर्वभागातील पाखरे पिंपळगाव येथील सर्जेराव पाखरे हे ग्रामीण भागातील एक शिक्षक असून मावळ तालुक्यामध्ये राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित होतो याचा अर्थ पाथर्डी तालुक्याचे मान उंचावेल अशी कामगिरी या शिक्षकांनी केली आहे मावळ तालुक्यातील अतिशय डोंगराळ दुर्गम भागातील मोरवे शाळेचे उपक्रमशिल शिक्षक सर्जेराव पाखरे यांना नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे बॅण्ड सिनेअभिनेते जयराम नायर व आय.एफ.एस. डॉ. एस.एच पाटील यांच्या हस्ते राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनात राज्यस्तरीय आयडियल टीचर गुणरत्न २०२१ चा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सर्जेराव पाखरे यांनी शेकडो उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थांना नाविन्यपूर्ण शिक्षण दिले आहे. अतिशय होतकरु व कर्तव्यदक्ष असलेले शिक्षक सर्जेराव पाखरे शाळेच्या गावात राहुण प्रामाणिक पणे ज्ञानदान करतात. कोरोना काळात गावात राहुण विद्यार्थांच्या घरी जाऊन, वाडी,वस्तीवर गृह भेटी देऊन अध्यापन करणारे शिक्षक सर्वांचे सुपरिचित आहेत. विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांच्याशी सलोख्याचे संबध असल्यामुळे ते सर्वांचे आदर्श आहेत. पाखरे यांना सामाजिक संस्था व शासनस्तरावरुन अनेकदा सन्मानित करण्यात आले आहे. कोरोनाकाळातील शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेऊन पुणे येथे पर्यावरण संमेलनात राज्यस्तरावरील आयडिल टीचर पुरस्काराने पाखरे यांना सन्मानित केले. प्रमुख पाहुणे एनजीओ अध्यक्ष सुयोग धस, दिपक भवर, सचिन वाघ, लताश्री वडनेर, हरीविजय देशमुख, राजेंद्र नागवडे यावेळी उपस्थित होते तर राज्यस्तरीय आयडियल शिक्षक गुणरत्न पुरस्काराने सर्जेराव पाखरे यांना सन्मानित केल्यामुळे त्यांच्या राज्यभारातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.