आजचे पंचांग व राशिभविष्य दि.५/१०/२०२२

🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आश्विन १३ शके १९४४
दिनांक :- ०५/१०/२०२२,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२२,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:१३,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- शरदऋतु
मास :- आश्विन
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- दशमी समाप्ति १२:०१,
नक्षत्र :- श्रवण समाप्ति २१:१५,
योग :- सुकर्मा समाप्ति ०८:२०, धृति २९:१८,
करण :- वणिज समाप्ति २२:५१,
चंद्र राशि :- मकर,
रविराशि – नक्षत्र :- कन्या – हस्त,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- शुभ दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी १२:१७ ते ०१:४६ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:२२ ते ०७:५१ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:५१ ते ०९:२० पर्यंत,
लाभ मुहूर्त — सकाळी १०:४९ ते १२:१७ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०४:४४ ते ०६:१३ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
विजयादशमी(दसरा), श्रीमध्वाचार्य जयंती, सरस्वती विसर्जन, सीमोल्लंघन, अपराजिता व शमीपूजन, अश्वपूजा, विजय मुहूर्त(१४:२६ ते १५:१३), एकादशी श्राद्ध, भद्रा २२:५१ नं.,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आश्विन १३ शके १९४४
दिनांक = ०६/१०/२०२२
वार = सौम्यवासरे(बुधवार)
मेष
आजचा दिवस गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून खूप चांगला असणार आहे. मात्र गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यातही तुमचे विशेष योगदान असेल. जवळच्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणी एखादा वाद होऊ शकतो. घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ
आज तुम्ही अध्यात्मात जास्त रस घ्याल. जर कुटुंबात वाद सुरु असेल, तर तो आज संपुष्टात येईल. आज तुम्हाला तुमच्या ध्येयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागेल, तरच ते पूर्ण होईल. संपत्तीशी संबंधित एखाद्या वादात विजय मिळाल्याने आनंद होईल. मुलांच्या शिक्षणानिमित्ताने प्रवास घडू शकतो. कुटुंबातील कोणत्याही सदस्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला वरिष्ठांशी संवाद साधावा लागेल.
मिथुन
कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. कामचा भारही वाढेल. आरोग्याबाबत सावध राहा वैद्यकीय खर्च वाढू शकतो. व्यवसायाचा विस्तार होईल. उत्पन्न वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. मनात निराशा आणि असंतोषाची भावना राहील. कौटुंबिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. पैशाची चणचण भासेल. आरोग्याबाबत काही समस्या उद्भवू शकतात. मित्रांचे सहकार्य मिळेल.
कर्क
आजच्या दिवशी विद्यार्थ्यांना फायदा होईल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. अनावश्यक वाद टाळा. मनःशांती लाभेल. कुटुंबातील एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून पैसे मिळू शकतात. अनियोजित खर्च वाढतील. संभाषणात संतुलन राखा. आरोग्याचीही काळजी घ्या. मनःशांती लाभेल. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. विनाकारण एखादा गोंधळ निर्माण होऊ शकतो.
सिंह
आजचा दिवस शुभ राहील, महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळेल. किरकोळ व्यापारी आज लाभाच्या स्थितीत राहतील. यासोबतच दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक लाभ होईल. तरुणांच्या मनात नकारात्मक विचार येऊ शकतात. पण, या विचारांना तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. तुम्हाला वडिलांकडून आर्थिक मदत मिळू शकते. धनलाभाची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा सध्याचा त्रास दूर होईल.
कन्या
जोडीदाराच्या आरोग्याकडे योग्य लक्ष देणे आणि त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या अवास्तव योजना संपत्तीचा दुरोपयोग करू शकतात. कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे ओझे वाढेल, ज्यामुळे तुम्ही तणावग्रस्त होऊ शकता. प्रेमाची अनुभूती अनुभवाच्या पलीकडची आहे, पण आज तुम्हाला या त्याची काहीशी झलक पाहायला मिळेल.
तूळ
करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला जाणार आहे. नवीन वाहन किंवा घर घेण्याची इच्छा आज पूर्ण होईल. घाईघाईत आणि भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेणे टाळा. अन्यथा चूक होऊ शकते. वरिष्ठ सदस्यांच्या मदतीने तुम्हाला व्यवसायात येणाऱ्या समस्येचे निराकरण सहज मिळेल, नवी नोकरी शोधणाऱ्यांना यश मिळेल. तुमच्या चांगल्या विचारसरणीचा फायदा होईल.
वृश्चिक
दिवसाची सुरुवात यशस्वी होईल. आज तुम्हाला तुमच्या काही राजनैतिक संपर्कांचा फायदा होऊ शकतो. कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या तुम्ही योग्यरित्या पार पाडू शकाल. जवळच्या व्यक्तीसोबत अप्रिय घटना घडू शकते. यामुळे मन थोडे निराश होऊ शकते. मनातील संशयाची भावना बळावू शकते. म्हणूनच आपले वागणे बदलणे महत्त्वाचे आहे. कार्यक्षेत्रात तुम्हाला चांगले यश मिळू शकते.
धनु
मनात नकारात्मकता येऊ शकते. मनःशांती राखण्याचा प्रयत्न करा. शैक्षणिक कामात अडचणी येऊ शकतात. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. व्यवसायाकडे लक्ष द्या. खर्च जास्त होईल. आरोग्याची काळजी घ्या. रागाचा अतिरेक होईल. स्वावलंबी व्हा. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. कुटुंबापासून दूर जाऊ शकता. संगीतात रुची वाढू शकते. कुटुंबात सुख-शांती राहील.
मकर
बोलण्यात संयम बाळगा. कारण, एखाद्याला तुमचे शब्द टोचू शकतात. यामुळे नाते तुटण्याच्या मार्गावरही येऊ शकते. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे, प्रयत्न करत रहा. प्रवास लाभदायक ठरेल. भाग्य तुम्हाला साथ देईल. रोजगार वाढेल. उत्पन्न वाढेल. आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देईल. तुमचा प्रभाव वाढल्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.
कुंभ
घराशी संबंधित जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीत वेळ जाईल. तुमची सकारात्मक आणि आश्वासक वृत्ती तुम्हाला समाजात आणि कुटुंबात आदर मिळवून देईल. तरुणांनी आपल्या ध्येयासाठी कठोर परिश्रम केल्यास यश निश्चितच मिळेल. कोणतेही काम करताना बजेट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. इतरांच्या कामात विनाकारण ढवळाढवळ करू नका.
मीन
तुम्हाला व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. नवीन करार होतील. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती चांगली असेल. परंतु, तुम्हाला तुमच्या बचतीच्या पैशातून काहीतरी खरेदी करावे लागेल. अशा परिस्थितीत अजिबात संकोच न करता पैसे गुंतव ण्याचा विचार करा. तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. घरी पाहुणे येतील. आनंदात वाढ होईल. एखादे मोठे काम करण्याची इच्छा निर्माण होईल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर