पत्रकारांनी समाजातील चांगल्या कामांना ओळख मिळवून द्यावी :- राज्यपाल कोश्यारी
रायगड प्रतिनिधी
महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या शिष्टमंङळाने संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेवून पत्रकारांच्या मागण्याबाबत चर्चा केली.
समाजातील उणिवा व दोष शोधणे हे पत्रकारांचे काम आहे. मात्र, हे काम करीत असताना समाजातील चांगल्या कामांना देखील पत्रकारांनी ओळख मिळवून द्यावी. पत्रकारांनी दिलेली ओळख व शाबासकी समाजाला अधिक चांगले कार्य करण्यास निश्चितपणे प्रोत्साहन देईल,असे यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले .
शेतकरी,कामगार,आदिवासी बांधव आणि पत्रकारांच्या विविध समस्यांवर चर्चा केली,तसेच राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नासह आरोग्य, निवारा,पाल्यांच्या शैक्षणिक आणि कौटुंबिक मुद्यांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.या समस्यांच्या सोङवणुकीसाठी विविध उपायांवर चर्चा झाली ..तसेच आदिवासी विकास समितीच्या प्रदेशाध्यक्ष अनिल भांगले प्रदेश कार्याध्यक्ष प्राध्यापक किरण चव्हाण यांनी ही निवेदन देऊन चर्चा केली,यावेळी राज्यपाल महोदयांनी समस्या जाणून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला.

यावेळी संघाचे संस्थापक-अध्यक्ष विजय सुर्यवंशी,आदिवासी विकास समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल भांगले,महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष प्रा.किरण चव्हाण सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖