डी.वाय. पाटील महाविद्यालयात पार पडला ‘दांडीया महोत्सव!

‘
आकुर्डी दि५ डाॕ.डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीचे, डाॕ.डी.वाय पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी येथे नवरात्र उत्साहानिमित्त दांडीया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.पी. डी. पाटील , उपाध्यक्षा डाॕ. भाग्यश्रीताई पाटील, सचिव मा.डॉ. सोमनाथ दादा पाटील, विश्वस्त डाॕ. स्मिता जाधव मॕडम, प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन निगडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक उत्तम ओमासे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात आपल्या कलागुणांना वाव देणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपला कलेचा विकास केला पाहिजे. कार्यक्रम उत्साहात आणि आनंदात पार पाडत असताना, मनमुदात आनंद घेत असताना कार्यक्रमाला कोणतही गालबोट लागणार नाही याची दक्षता विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे असे मत व्यक्त केले
महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांनी आपल्या अध्यक्षिय मार्गदर्शनात विद्यार्थ्यांच्या कला-गुणांचा विकास होऊन आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध खेळात प्रावीण्य मिळवून अनेक स्पर्धे यश संपादन करावे हाच उद्देश असे कार्यक्रम आयोजन करण्यामागे आहे असे मत मांडले.
दांडीया महोत्सवानिमित्त ‘दांडीया’ आणि ‘गरबा’ साऊंड सिस्टिमच्या आवाजावर विविध देवी देवतांच्या गाण्यावर तालबद्ध पद्धतीने खेळण्यात आला. दांडियासाठी आवश्यक साहित्य( टिपऱ्या) घेऊन विद्यार्थी मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभागी झाले, अतिशय आकर्षक पद्धतीने दांडिया विद्यार्थी खेळत होते. सलग तीन तास विविध राऊडमध्ये दांडिया खेळ शिस्तबद्धपणे खेळला. दांडिया कार्यक्रमात उत्कृष्टपणे ‘दांडिया’ आणि ‘गरबा’ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांक मिळणाऱ्या सोनू चौधरी या विद्यार्थीनीला पैठणी देऊन तर अनुक्रमे व्दितीय आणि तृतीय क्रमांक मिळणाऱ्या ईश्वरी जोशी आणि निखिल गायकवाड यांना स्ट्राॕफी आणि बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. प्राध्यापकांमधून प्रा. यशदा शिंदे यांना गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून कु. प्रतिक्षा इंगळे व प्रा.भार्गवी कुलकर्णी यांनी जबाबदारी पार पाडली.
कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी विद्यार्थी प्रतिनिधी व प्रा.डाॕ. मुकेश तिवारी, प्रा.डाॕ. विजय गाडे, प्रा. गणेश फुंदे, प्रा. खालिद शेख, प्रा. राधाकृष्ण ठाणगे, डाॕ. मिनल भोसले, प्रा. चेतन सरवदे प्रा. भागवत देशमुख, प्रा. हेमल ढगे, प्रा. करिष्मा सय्यद प्रा. सतिश ठाकर, प्रा. बबलू नवले, प्रा.रोहित वरवडकर प्रा. सौरभ शिंदे यांनी पार पाडली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
