दाते सरांसारखा विकास कोणीच करू शकत नाही : सभापती गणेश शेळके

अस्तगाव मध्ये विकास कामांचे लोकार्पण
पारनेर प्रतिनिधी
-अस्तगाव (ता. पारनेर) येथील जिल्हा परिषद अहमदनगर समाज कल्याण विभाग अंतर्गत पाण्याची टाकी व वितरण व्यवस्था करणे – ९.५० लक्ष रुपये व पंचायत समितीच्या १५ वित्त आयोग अंतर्गत जल शुद्धीकरण प्लांट बसवणे – ३ लक्ष कामाचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी पंचायत समिती सभापती गणेशराव शेळके, जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीचे सदस्य राहुल पाटील शिंदे, सुपा उपसरपंच दत्ता नाना पवार, माजी उपसरपंच सागर मैड, युवा नेते सुरेश नेटके इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.
यावेळी बोलताना सभापती दाते सर म्हणाले पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांनी तालुक्यात ६२ गावांना जलशुद्धीकरण प्लान्ट बसवले आणि त्या गावचा आरोग्याचा प्रश्न कायमचा मिटवला. या कामाला मी त्यांना धन्यवाद देतो. अस्तगाव चे कार्यकर्ते थोडे उशिरा माझ्याकडे आले शेजारी सुप्यात सुचवलेली सर्व कामे करून दिले. माझ्या बांधकाम समितीच्या कार्यकाळात आले असते तर येथील सर्व विकासकामे मार्गे लावून दिले असते. परंतु काही हरकत नाही पुढील काळात जिल्हा परिषद निवडणुकीनंतर या गावचे राहिलेले सर्व विकासकामे मार्ग लावून देण्याचा प्रयत्न करीन. यात कोठेही कमी पडणार नाही. पाण्याच्या टाकीचे काम अतिशय चांगल्या दर्जाचे झाले असल्याचे तुम्ही सांगितले. आपला शाळा खोल्यांचा राहिलेला प्रश्न मी मार्गी लावून देईल याची काळजी करू नका. हा फार जिव्हाळ्याचा विषय आहे. हा छोटासा कार्यक्रम होता आपण सर्वांनी आम्हाला बोलावले, आमचा मान सन्मान केला सर्वांना धन्यवाद देतो. अशाच पद्धतीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्य केली.
यावेळी बोलताना सभापती गणेश शेळके म्हणाले या परिसरातील नागरिक जेव्हा जेव्हा दाते सरांकडे गेले तेव्हा सरांनी कामाला नाही म्हटले नाही. गेल्या अडीच वर्षात तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मागणीला पूर्ण करून त्यांना ताकत देण्याचे काम सरांनी केले. साधारण आठ महिन्यापूर्वी अस्तगावचे ग्रामस्थ माझ्याकडे आले आणि त्यांनी आरो प्लान्टची बसवण्याची मागणी केली. आणि एक महिन्याच्या आत मी तुम्हाला जल शुद्धीकरण प्लान्ट बसून दिला आणि आरोग्याचा प्रश्न कायमचा मिटला यासारखे पुण्य कोठे मिळणार नाही. आपण दिलेल्या कामाचा जनतेला काही उपयोग होतो का ? यात समाधान फार मोठा आहे. येथील शाळा खोल्या बाबत सरांनी व मी दोन, दोन खोल्या देण्याची शिफारस केली होती. परंतु आम्हा दोघांनाही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून येथील शाळा खोल्यांची मागणी आलेली आहे. त्यामुळे तुम्ही दुसरीकडे शाळा खोल्या घ्या असे सांगण्यात आले, नाही तर सरांनी दोन शाळा खोल्या अस्तगावला देण्यासाठी पत्र दिले होते आणि मीही दोन खोल्यांसाठी शिफारस केली होती. आपल्या गावचा शाळा खोल्यांचा प्रश्न कायमचा मिटला असता. सुप्यातही असेच झाले. आपणही करायचं नाही! आणि दुसऱ्यालाही काही करू द्यायचं नाही. सभापती दाते सरांसारखा विकास तालुक्यात दुसरा कोणी करू शकत नाही.
लोकांना आश्वासने देत असताना आपण ते पूर्ण करू शकतो का ? याचा विचार व्हायला हवा अलिकडच्या काळात आपल्या तालुक्यात हजारो कोटींची आश्वासने दिली जातात, हे आपल्याला चांगले वाटते. परंतु आपण सर्वसामान्यांची दिशाभूल करतो, याचे प्रायचित्त भोगावे लागते. काळ हा प्रत्येकाचे उत्तर आहे. लोकांची काय गरज आहे हे न करता दुसरच काहीतरी दाखवायचं हे सध्या चालू आहेराहुल पाटील शिंदे
जल व्यवस्थापन समिती सदस्य
यावेळी शाखाप्रमुख सुरेश काळे, उपसरपंच ईश्वर पठारे, गोरख पठारे, ग्राम. सदस्य सीमा काळे, संध्या काळे, मा. सरपंच गोरख काळे,संजय गाढवे, चेअरमन सुरेश बाजीराव काळे, मधुकर पठारे, निखिल तोडे, वैभव काळे, संतोष काळे, सुनील काळे, आदर्श काळे, लताबाई सुरेश काळे, प्रमोद काळे, जगताप गुरुजी, दिलीप शिंगाडे, कल्याण काळे, विनोद वैराळ, अक्षय पठारे, नितीन काळे, रवींद्र पठारे, प्रमोद काळे, अरुण पठारे, राजू काळे, सागर काळे, कामाचे ठेकेदार इंजि. संकेत खोसे, ग्रामसेविका वाळुंजकर मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष काळे यांनी केले आभार मधुकर पठारे यांनी मानले.