भायगाव येथील नाथभक्तांच्या कावड यात्रेचे पैठणकडे प्रस्थान

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव – नेवासा राजमार्गावरील भायगाव येथील नाथ भक्तांच्या कावड यात्रेचे श्री क्षेत्र पैठणकडे प्रस्थान झाले.कावड यात्रेचे हे २५ वे वर्ष आहे. यावेळी भायगावचे ग्रामदैवत नवनाथ बाबा मंदिराच्या प्रांगणात उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
दक्षिण काशी म्हणून संबोधलेल्या श्री क्षेत्र पैठण ते श्री क्षेत्र मढी व मायंबा (सावरगाव ) येथे सुरू असलेल्या यात्रेनिमित्त व गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नाथ समाधीवर गोदावरीच्या पवित्र जलाने जलअभिषेकासाठी भायगाव व पैठण तालुक्यातील लामगव्हाण येथील नाथ भक्तांनी ५ /४ /२०२४ रोजी श्री क्षेत्र पैठण येथून गोदावरीच्या पवित्रजल घेऊन श्री क्षेत्र मढीच्या दिशेने नाथ भक्तांनी आगे कूच केली आहे.पहिला मुक्काम घोटण तालुका शेवगाव तर दुसरा मुक्काम काळेगाव तिसरा मुक्काम निवडुंगे व चौथ्या दिवशी श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या समाधीला जलाभिषेक करून मायंबा (सावरगाव ) येथील चैतन्य मच्छिंद्रनाथ बाबांच्या समाधीला जलाभिषेक करून नंतर भायगाव येथील ग्रामदैवत नवनाथ बाबा यांच्या समाधीच्या जलाभिषेकानंतर या कावड यात्रेचा भायगाव येथे समारोप होणार आहे.कावड यात्रे दरम्यान हरिचंद्र चव्हाण, शंकर दुकळे, दत्तात्रेय भापकर, संजय आरगडे, भगवान लांडे, रमेश आढाव, बाबासाहेब केदार, आण्णासाहेब मरकड, अशोक जावळे, अर्जुन भापकर, रोहित खाटिक, विष्णु दुकळे, राजेंद्र आरगडे, संभाजी कडूस यांच्या वतीने अन्नदान करण्यात येणार आहे. तर अशोक आढाव, संदीप लांडे, जयराम शेळके, गोटीराम नेव्हल, संजय भापकर, सोमनाथ दुकळे, आप्णासाहेब नेव्हल, अक्षय घुले, रवींद्र जाधव, नारायण अकोलकर, अजित आढाव, सचिन लांडे, गोविंद पांढरे, गणेश कानडे, कडूबाळ शेकडे, बंडू शेकडे, अशोक जाधव, रामेश्वर तेजीनकर, भाऊसाहेब जाधव, सुरेश शेळके, संदिप लंघे, कडुबाळ जाधव यांच्यासह आदि नाथ भक्त या कावड यात्रेत सहभागी आहेत.प्रस्थान वेळी भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव, जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी हरिचंद्र चव्हाण, डॉ.दत्तात्रय धावणे, गंगाराम नेव्हल, कडुबाळ आढाव,श्रीराम (पप्पु ) आढाव, अभिजित आढाव, योगेश शेळके, ओंकार आरगडे आदींनी ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा दिल्या आहेत.