इतरकोंकणमनोरंजन

उरण विशेष सम्मान 2022 सोहळ्यात नवदुर्गांचा सन्मान प्रदान

चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरणचा उपक्रम

हेमंत देशमुख

रायगड/उरण

नवरात्री उत्सव चे अवचित्य साधून चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण, रायगड तर्फे संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष श्री विकास कडू यांच्या मार्गदर्शनाखाली उरण मधील नव दुर्गा (विविध श्रेत्रातील नऊ महिलांचे )उरण विशेष सम्मान 2022 या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले सम्मानित केलेल्या नऊ दुर्गा खालील प्रमाणे
1)सौ सुमनताई संग्राम तोगारे (समाजसेविका )
2)कु. श्वेता यशवन्त भोईर, विंधणे (पत्रकारिता )
3)सौ. दर्शना प्रफुल्ल माळी, बलई (निवेदका)
4)डॉ. स्वाती सुयोग म्हात्रे, आवरे
(आरोग्य सेवा)
5)सौ. नीता विजय डाऊर, कारंजा
(महाराष्ट्र पोलीस )
6)कु. धनश्री गणेश बंडा, नवघर
(गायिका )
7)सौ वर्षा मनीष म्हात्रे, कुंभारवाडा
(आदर्श शिक्षका )
8)कु. अनघा प्रदीप कडू, सोनारी
(अभिनेत्री )
9)कु. अमेघा अरुण घरत, खोपटे
(राष्ट्रीय कुस्ती पटू )

या उरण तालुक्यातील महिलांचा शाल, श्रीफळ, समानचिन्ह, संस्थेचे प्रमाण पत्र, साडी, तुळशीचे रोपटे देऊन उरण विशेष सम्मान 2022 या पुरस्काराने गौरवण्यात आले

या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विकास कडू, कुणाल पाटील (वाहतूक सेना उपाध्यक्ष उरण )जाणता राजा प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री विवेक पाटील, कौशिक रोडलाईन चे श्री सुजित तांडेल, श्री जितेंद्र पाटील (भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ), श्री संदीप तांडेल (पागोटे )श्री प्रकाश तांडेल(गायक ),श्री अरुण घरत (शिक्षक), तसेच श्री साई गणेश नवरात्र उत्सव मंडळाच्या महिला सौ.हर्षली तांडेल सौ.अर्चना तांडेल सौ.नंदिनी ठाकुर सौ.रसिका तांडेल सौ.भरती म्हात्रे सौ.चंद्रभागा ठाकूर सौ..हेमांगी ठाकूर सौ.विक्रांती तांडेल.सौ.प्रगती ठाकूर सौ.नंदिनी ठाकुर उपस्थित होत्या


कार्यक्रम पागोटे हुतात्मा स्मारक जवळ हुतात्मा रंगमंच पागोटे येथे पार पडला श्री साई गणेश नवरात्र मंडळ पागोटे चे सभासद प्रशांत तांडेल,रोशन ठाकूर,विशाल ठाकूर,जगदीश तांडेल, नरेंद्र तांडेल,देवेंद्र तांडेल,प्रभाकर म्हात्रे
नयन पाटील,वैभव पाटील,राकेश म्हात्रे, संदीप म्हात्रेयांनी या याकार्यक्रमाचे नियोजन केले होते या कार्यक्रमाला सर्व पागोटे ग्रामस्त उपस्थित होते

संस्थेतर्फे मनोज ठाकूर (उपाध्यक्ष )तुषार ठाकूर (उपाध्यक्ष )ह्रितिक पाटील (कार्याध्यक्ष)राजेश ठाकूर (सह सचिव )उद्धव कोळी (सह खजिनदार ), विवेक कडू (सदस्य )विनय पाटील (सदस्य )विक्रांत कडू, आदित्य पारवे आदी ने कार्यक्रम पार पाडण्यासाठी मेहनत घेतली
कार्यक्रमाचे प्रस्तावना श्री विकास कडू यांनी केली ते म्हणाले कि “आज वर आम्ही अनेक उपक्रम राबवले आदिवासी वाडी मध्ये अन्न धान्य वाटप, झोपडपट्टी मध्ये अन्नदान, अनाथ आश्रम मध्ये उपयोगी वस्तू वाटप, मतिमंद शाळे मध्ये बुद्धीला चालना मिलेल त्या वस्तू वाटप, रक्तदान शिबीर, वृक्षरोपण, समुद्र किनारी श्रम दान, विविध शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप, आंगण वाड्यामध्ये खाऊ वाटप केले परंतु आजचा कार्यक्रम आमच्या चाईल्ड केअर सामाजिक संस्थेची उंची वाढवणारा आहे कारण आज उरण तालुक्यातील नवदुर्गा चे यथोचित मान सम्मान देऊन उरण विशेष सम्मान 2022 पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे”
सर्व पुरस्कार घेणाऱ्या नव दुर्गा नी चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण, रायगड चे तोंड भरून कौतुक केले आणी आभार मानले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विवेक पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री तुषार ठाकूर यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button