राष्ट्रीय महामार्ग २२२ मध्ये बाधित शेतकर्यांच्या जमिनी बाबत च्या त्या निवेदना विरोधात शेतकऱ्यां ची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

अहंदनगर प्रतिनिधी
नगर तालुक्यातील मौजे केडगाव, निंबळक, बोल्हेगाव, नालेगाव, नेप्ती, सोनेवाडी, या गावातील शेतकर्यांच्या जमिनीचा वाढीव नुकसान भरपाईचे दावे दाखल करून सहा वर्षे झाली असुन अद्याप शेतकर्यांना त्याचा निकाल दिला नाही.
सदर दावे आम्ही AMS CONSULTANCE यांच्याकडे दिले असुन आम्हा सर्व शेतकर्यांची त्यांच्या बाबत कुठलीही शंका नाही त्यानी आमच्याकडून कुठेही कधीही कशाचीही मागणी केली नाही किंवा आम्ही शेतकर्यांनी त्यांना काही दिले नाही.
सदर बाब काही विघ्नसंतोषी प्रवृत्तीचे लोक व शेतकरी विरोधी लोकांनी चुकीचे बदनामी करण्याचे षड्यंत्र बनवले आहे. त्यामुळे आज शेतकर्यांना मदत करणार्या व्यक्तीला हे सर्व लोक टारगेट करत आहेत म्हणून सर्व शेतकरी नाराज आहेत. त्यामुळे सर्व गावच्या बाधित शेतकर्यांनी मा. जिल्हधिकारी सालेमठ यांना निवेदन देऊन सदर बाब सांगितली आणि शेतकरी विरोधात काही बाबी झाल्या तर सर्व शेतकरी यांनी तीव्र आंदोलनाचा ईशारा दिला आहे.
जर शेतकर्यांचा एवढाच कळकळा होता तर सर्व शेतकरी गेली ५ ते ६ वर्षे पासून नुकसान भरपाई मिळणेसाठी NHAI यांचे बरोबर लढत आहेत मग हे लोक काय करत होती. सर्व गोष्टी नियमाप्रमाणे मार्गी लागत असताना शेतकर्यांच्या अन्नामध्ये काही विघ्नसंतोषी लोकांनी माती कालवायचे काम सुरू केले आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या होणार्या पुढील नुकसानीस सदर विघ्नसंतोषी लोक व शेतकरी विरोधी काम करणारे जबाबदार राहतील. हा ईशारा संतप्त शेतकरी यांनी दिला. यावेळी वरील सर्व गावचे बाधित शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.