इतर

जी एस महानगर बॅंकेची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबई येथे खेळी मेळीच्या वातावरण संपन्न .

दत्ता ठुबे

पारनेर – सॉलिसीटर गुलाबराव शेळके महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या अध्यक्षा श्रीमती सुमनताई गुलाबराव शेळके यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मुंबईतील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या महात्मा गांधी सभागृहात अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली .
रिझर्व बँकेने सक्षम बँकांसाठी नमूद केलेल्या सर्व निकषांची पूर्तता करत जी एस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेचा सन २०२३ व २४ या आर्थिक वर्षात निव्वळ नफा मागील वर्षापेक्षा १० कोटी रुपयांनी वाढवून ३० कोटी रुपये इतका झालेला आहे . तसेच बँकेस सातत्याने ” अ ” ऑडीट वर्ग प्राप्त झालेला आहे . बँक नक्त एन पी ए चे प्रमाण शेकडा शून्य टक्के राखण्यात यशस्वी झालेली असून यापुढेही एन पी ए चे प्रमाण शुन्य राखण्याचा मानस आहे . बँकेने सन सन २०२३ – २४ या आर्थिक वर्षात एकूण ठेवी २ हजार ८८५ कोटी रुपये असे एकूण कर्जे १ हजार ५७४ कोटी असा एकूण ४ हजार ४५९ कोटी रुपये व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला असून बँकेची गुंतवणूक १ हजार ४९५ कोटी रुपये इतकी आहे .
जी एस महानगर बँकेची सर्व च स्तरावर नेत्रदिपक कामगिरी करीत असून बँकेचा लौकिक व विश्वासार्हतता बँकेने कायम टिकवून ठेवलेली आहे . बँकेच्या भव्य व सुसज्ज अशा स्वमालकी च्या ९ मजली नवीन प्रशासकीय कार्यालयीन इमारतीचे दिवंगत सॉलिसीटर गुलाबराव शेळके साहेबां चे स्वप्न साकार होत असून लवकरच बँकेच्या लालबाग येथील जुन्या जागेतून नवीन प्रशासकीय कार्यालयात स्थलांतरीत होत आहे , अशी माहिती जी एस महानगर बँकेच्या अध्यक्षा श्रीमती सुमनताई गुलाबराव शेळके यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात दिली .
या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळांनी केलेल्या शिफारशीनुसार सर्वसाधारण त्यांच्या भाग भांडवल रकमेवर शेकडा १० टक्के लाभांश जाहीर केलेला आहे, तसेच बँकेचे सभासद, ठेवीदार व खातेदार यांच्या सक्रिय सहभागाने बँकेची प्रगती शक्य झालेली असून त्या सर्वांचे व बँकेचे अधिकारी कर्मचारी , दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांचे महानगर बँकेचे अध्यक्षा श्रीमती सुमनताई गुलाबराव शेळके यांनी बँकेच्या वतीने आभार व्यक्त केले .
यावेळी सभेच्या विविध विषयांचे संचालकांनी वाचन करून सभासदांनी ही सर्व विषयांना टाळ्यांच्या गजरात एकमुखी मंजूरी देण्यात आली . या प्रसंगी सभासदांनी उपस्थित केलेल्या मुद्दांनाही संचालकांनी उत्तरे दिल्याने ही ५१ वी वार्षिक सर्व साधारण सभा अतिशय खेळी मेळीत संपन्न झाली .


बँकेच्या वतीने गुणवंतांचा सन्मान –
बँकेच्या ५१ व्या वार्षिक सर्व साधारण सभेत सभासद व त्यांच्या गुणवंत , ज्ञानवंत पाल्यांचा सन्मान करण्यात आला . यावेळी बँकेचे सभासद व पत्रकार सुरेश खोसे पाटील यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या नगर जिल्हा सचिव पदावर निवड करण्यात आल्याबद्दल बँकेच्या अध्यक्षा श्रीमती शेळके यांच्या हस्ते व संचालक मंडळ , सभासद आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शाल व पुष्प गुच्छ देवून गौरविण्यात आले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button