महाराष्ट्र

खाजगीकरणा विरोधात रस्त्यावर उतरण्याचा विद्यूत मजदूर महासंघाचा इशारा!

अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाचे नाशिक येथे स्वर्णमहोत्सवी अधिवेशन संपन्न .

नाशिक दि १६
केंद्र व राज्य सरकारच्या बे लगाम खाजगी करणाच्या धोरणाविरुद्ध रस्त्यावर येऊन संघर्ष करण्याचा निर्धार अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाचे नाशिक येथे पार पडलेल्या स्वर्णमहोत्सवी त्रैवार्षिक अधिवेशनात करण्यात आला

यावेळी महासंघाचे अध्यक्ष श्री आर मुरलीकृष्णन यांनी एका ठरावाच्या माध्यमातून विद्युत उद्योगाच्या सद्य स्थितीवर प्रकाश टाकला केंद्र व राज्य यांच्यातील राजकीय विसंवादामुळे वितरण कंपन्या ह्या डबघाईला आलेल्या असून राज्य  सरकारे केंद्र सरकारकडून मिळालेल्या मदतीचा दुरूपयोग करीत आहेत व याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करून आणखी मदत देत आहे
कोल इंडियाची थकबाकी चुकती न करता परदेशातून कोळसा खरेदी करायचा आणी महागडा कोळसा खरेदी करावा लागतो म्हणून विजेचे दर वाढवायचे आणि विजेचे दर वाढले म्हणून थकबाकी वाढली म्हणून खाजगीकरण अशा सरकार निर्मित दुष्ट चक्रात देशातील विद्युत वितरण कंपन्या सापडल्या आहेत.त्यामुळे खाजगीकरणासाठी उपयुक्त वातावरण तयार करणाऱ्या केंद्र व राज्य सरकार विरुद्ध रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा निर्धार ह्या ठरावाच्या माध्यमातून करण्यांत आला आहे.
ह्या व्यतिरिक्त 1)वन नेशन वन ग्रीड वन पेन्शन. 2)समान काम समान दाम , 3)शाश्वत रोजगार 4) कंत्राटी कामगारांना रोजगारात न्याया मिळण्यासाठी प्रयत्न करणे. आदी विविध ठराव मंजूर करण्यात आले.
सकाळच्या चिंतन सत्रात विनायक गोविलकर यांनी कार्य व कार्यकर्ता हा विषय भारतीय मजदूर संघाच्या परिभाषेत अतिशय सुलभ भाषेत मार्गदर्शन केले.
मागील 50 वर्षात ज्या कार्यकर्त्यानी अथक परिश्रम करून कार्य विस्तार करण्यासाठी बहुमोल योगदान दिले अशा कार्यकर्त्यांचा या अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


देशांतील विद्युत क्षेत्रापुढे जी आव्हाने उभी आहेत त्याचा विचार करून यावेळी सर्वसमावेशक अशी कार्यकारिणी निवडण्यात आली.

राजस्थानचे मधुसूदन जोशी यांची अध्यक्ष म्हणून तर किशोरीलाल रायकवार (मध्य प्रदेश )महामंत्री म्हणून यांची निवड करण्यात आली श्री वसंत काळे (महाराष्ट्र)नवे संघटन मंत्री असतील. तर दत्ता न्हावकर (महाराष्ट्र )उप महामंत्री पदाची जबाबदारी सांभाळतील. मनोज शर्मा (छत्तीसगढ) हे कोषाध्यक्षाचे दायित्व संभाळतील. सौ शर्मिला पाटील (मुंबई महाराष्ट्र )यांची उपाध्यक्षपदी तर तुकाराम डिंबळे (पुणे महाराष्ट्र) सचिवपदी निवड झाली.
श्री दत्ता धामणकर श्री विठ्ठल भालेराव,रिता ठाकरे,हेमंत मस्करे, चतुर सैंदाणे, हर्षल काटे, यांची केंद्रीय कार्यसमिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे महामंत्री श्री अरुण पीवळ (औरंगाबाद महाराष्ट्र) तसेच महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे सरचिटणीस सचिन मेंगाळे (पुणे महाराष्ट्र) यांची केंद्रीत कार्यसमिती चे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button