इतर
राजूर येथे जिवाजी महाले यांची जयंती साजरी

. राजूर/ प्रतिनिधी
श्री संत सेना नाभिक सेवा संघ राजूरच्या वतीने शूरवीर नाभिक रत्न शिवरत्न व छत्रपतीशिवाजी महाराज यांचे विश्र्वासू सहकारी अंगरक्षक असलेले शूरवीर जिवाजी महाले यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली
. प्रथम रेणुका मातेची आरती करून शूरवीर नाभिकरत्न शिवरत्न जिवाजी महाले यांना पुष्पहार घालून जय शिवाजी जय जिवाजी अशी घोषणा करून सर्व समाज बांधवांनी जय जय कार केला तसेच जिवा महाला यांचे विषयी मार्गदर्शन केले
त्याप्रसंगी संत सेना नाभिक सेवा संघाचे अध्यक्ष विनायक पंडित कार्याध्यक्ष विलास तुपे अमोल पंडित गणेश बोराडे सुनील पंडित योगेश पंडित ज्ञानेश्वर बिडवे प्रमोद पंडित अमोल पंडित सिद्धी पंडित सृष्टी पंडित सिद्धार्थ पवार रवींद्र हंगेकर इतर समाज बांधव उपस्थित होते