वासुंदे येथील ५० वर्ष जुना रस्त्याचा प्रश्न सुटला,

सुजित झावरे यांच्या माध्यमातून रस्ता मजबुती करणास सुरुवात
दत्ता ठुबे/ पारनेर प्रतिनिधी
: वासुंदे गावातील अत्यंत महत्वाचा स्थानिक दावलमालिक व चेमटे वस्ती रस्ता गेले पन्नास वर्षापासून प्रलंबित होता. या रस्त्याचा प्रश्न अखेर सुजित झावरे पाटील यांनी गावातील सर्व ग्रामस्थांच्या मदतीने सोडविला
सदर रस्तासाठी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी मंजूर करून घेतला रस्ताचे भूमिपूजन समारंभ सुजित झावरे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. युवा नेते अमोल साळवे हे प्रमुख उपस्थित होते. यावेळी सुजित झावरे पाटील म्हणाले गावातील स्थानिक रस्त्याची समस्या गेल्या पन्नास वर्षापासून होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या दळणवळणाची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन तातडीने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने. स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यापुढील काळातही स्थानिक समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत राहणार आहे. विकासात्मक काम व प्रश्न व समस्या सोडवणे यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे.
दरम्यान यावेळी वासुंदे सेवा सोसायटीचे चेअरमन नारायण झावरे, उपसरपंच शंकर बर्वे, कान्हूर पठार पतसंस्थेचे संचालक पो. मा. झावरे, मा. चेअरमन दिलीप पाटोळे, लहानुभाऊ झावरे, वासुंदे सेवा सोसायटीचे संचालक लक्ष्मण झावरे, ढोकेश्वर पाणी वाटप संस्थेचे चेअरमन बाळासाहेब झावरे, डीएनएस पतसंस्थेचे संचालक बाळासाहेब झावरे पाटील, पोपटराव झावरे, ग्रामपंचायत सदस्य रामदास झावरे, पोपटराव हिंगडे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब शिंदे, मारूती उगले गुरुजी, निवृत्त कृषी अधिकारी सोन्याबापू बर्वे, मुख्याध्यापक मधुकर बर्वे सर, बाळासाहेब वाबळे, खंडू टोपले, सुदाम साळुंके, बाबाजी तळेकर, गोवर्धन झावरे, स्वप्नील दाते, डॉ. प्रसाद झावरे, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे तालुका संघटक महेश झावरे, समीर कंदलकर, सचिन साठे, रभाजी झावरे सर, देवराम बर्वे, बाळासाहेब साळुंके, पंढरीनाथ साळुंके, भाऊसाहेब झावरे, सुभाष मोरे, राजेश सावंत, रंगनाथ झावरे, पंढरीनाथ बर्वे, अक्षय दाते, संदीप झावरे, अक्षय झावरे, अजित चेमटे, तेजस बर्वे, संपत झावरे, शिवाजी बर्वे, गणेश झावरे, तोफिक राजे, साहेबराव गुंजाळ, बाळासाहेब वाबळे, बाबाजी बर्वे, प्रमोद झावरे, ठेकेदार निखिल दाते, ग्रामसेवक भास्कर लोंढे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
वासुंदे येथील मुख्य रस्त्यापासून दावलमालिक, चेमटे वस्ती, नांकर मळ्याकडे साधारण तीन किलोमीटर स्थानिक रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला होता या भागातील शेतकऱ्यांना दळणवळणासाठी अडचणी निर्माण होत होत्या. गेल्या पन्नास वर्षांपासूनचा प्रश्न सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून आता सुटला आहे. त्यामुळे समाधानाचे वातावरण आहे.
लक्ष्मण झावरेसंचालक, वि. का. सेवा सोसायटी, वासुंदे
