इतर

अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा शिवपानंद शेतरस्त्यांसाठी महाराजस्व अभियान

अहिल्यानगर -अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्ह्यातील तालुका प्रशासनास शिव पानंद शेतरस्त्यांसाठी दि.१३/०१/२०२५ ते २८/०२/२०२५ या कालावधीमध्ये कालबद्ध महाराजस्व अभियान राबविण्याच्या सुचना दिल्या आहेत

जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने १७ फेबुवारी महामोर्चाचे निवेदन देवून महाराजस्व अभियानासह विवीध मागण्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आल्या होत्या.
जिल्हाधिकारी यांनी मागणीची दखल घेत पुन्हा नव्याने कालबद्ध महाराजस्व अभियान राबविण्यासाठी जिल्ह्यासाठी विशेष परिपत्रक काढत तहसिल कार्यालयांना तातडीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तुकडेवारी सोबत कुटुंबाचे विभाजन होत असल्याने शेतीचेही विभाजन होत आहे त्यामुळे क्षेत्र कमी कमी होत असुन त्यामुळे दिवसेदिवस शेतरस्त्यांचे प्रश्न वाढत चालले असुन वहिवाटीचे शेतरस्ते बंद होताना दिसत आहेत.शेतीसाठी,शेतीपुरक व्यवसायांसाठी, दळणवळणाठी शिवपानंद शेतरस्ते होणे गरजेचे असल्याने शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने सातत्यपूर्ण पाठपुरावा करत शेतरस्त्यांच्या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधले असता जिल्हा प्रशासनाने मागण्यांची दखल घेतली.

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपआपल्या तालुक्यात पारदर्शक अभियान पार पाडण्यासाठी पाठपुरावा करावा तरी पुन्हा तहसिल कार्यालयांनी पारदर्शी अभियान पार न पाडल्यास १७ फेब्रुवारीला अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर नियोजित महामोर्चा काढण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button