पाथर्डीतील या गणेश मंडळाला राज्य शासनाचे २.५ लाखाचे बक्षीस!

पाथर्डी प्रतिनिधी:-
पाथर्डी शहरातील सुवर्णयोग गणेश तरुण मंडळाने राज्य शासनाचे अडीच लाखाचे बक्षीस पटकावले आहे
राज्य शासनाकडून गणेशोत्सव दरम्यान घेण्यात आलेल्या स्पर्धेत पाथर्डी शहरातील सुवर्णयुग तरुण मंडळाने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.बक्षिसाचे स्वरूप अडीच लाख रुपये व प्रमाणपत्र असे आहे.
राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.यामध्ये पाथर्डी शहरातील सुवर्णयुग तरुण मंडळाने गणपती उत्सव दरम्यान विविध सामाजिक उपक्रम राबवित स्पर्धेत सहभाग घेतला होता.यामध्ये मंडळाला द्वितीय क्रमांकाने गौरविण्यात आले.
मंडळा मार्फत वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.याची दखल राज्य शासनाकडून घेण्यात आली आहे. सुवर्णयुग मंडळाचे कोरोना काळातही सामाजिक उपक्रम राबवत गोरगरीब जनतेला किराणा वाटप, परप्रांतीय मजुरांना मदत यासह प्रशासनाला मोठी मदत केली होती. मंडळाने अनेक वर्षे अतिशय परिश्रम पुर्वक राबवलेल्या निसर्ग संवर्धन, वृक्ष लागवड व संगोपन यामध्ये ही मोठे कार्य केले आहे.