अकोले येथे जागतिक ग्राहक दिन साजरा

अकोले (प्रतिनिधी) तहसिल कार्यालयात जागतिक ग्राहकदिन अकोल्याचे तहसिलदार श्री सिध्दार्थ मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाला. यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा ग्राहकपंचायतचे उपाध्यक्ष श्री मच्छिंद्र मंडलिक, तालुकाध्यक्ष दत्तात्रय शेनकर, ज्ञानेश्वर पुंडे, कार्याध्यक्ष महेशराव नवले, रमेश राक्षे, माधवराव तिटमे, भाऊसाहेब वाकचौरे, दत्ता ताजणे, राम रुद्रे, नंदकुमार देशमुख, आदिंसह सर्व विभागाचे अधिकारी, महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी तहसिल सिध्दार्थ मोरे म्हणाले की ग्राहकांनी दिलेल्या अर्जाचे वाचन झालेले आहे. सर्व ग्राहकांच्या अर्जांना न्याय देण्याचे काम केले जाईल. प्रत्येक अर्ज त्या त्या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना पाठविला जाईल. कोणत्याही कामाच्या बाबतीत प्रशासनावर विश्वास असावा.सर्व अर्जांचा निपटारा केला जाईल अशी ग्वाही तहसिलदार मोरे यांनी दिली. तसेच तहसिलदार मीटिंग मध्ये व्यस्त असताना पुढील ग्राहकदीन मोठ्या प्रमाणात साजरा करू असे सांगितले.
ग्राहकदिनात बऱ्याच विभागाचे मुख्य अधिकारी गैरहजर असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. कृषी उत्पन्न बाजार समितिच्या आवारात शेतमालाचे शेतकऱ्यांसाठी तारण गोडाऊन लवकरात लवकर करावे. तहसिल कार्यालयात स्वच्छ्ता राखावित , पिण्याच्या पाण्याची दर्जेदार व्यवस्था तहसिल कार्यालयात व्हावी, अकोले ते संगमनेर एस टी बसच्या फेऱ्या वाढवाव्यात. अकोले ते गनोरे मार्गे संगमनेरच्या एस टी बस सुरु करण्याची मागणी खादी ग्रामोद्योगाचे संचालक राजेंद्र घायवट यांनी केली. याचबरोबर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा अंतर्गत ३२ गाव पाणीपुरवठा योजनेवर ३२ कोटी पेक्षाही अधिक खर्च झाला मात्र ती अद्यापही चालू झाली नसल्याने मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. १८ वर्ष झाले तरी काम पूर्ण होत नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर कार्यवाही करावी अन्यथा उपोषण करण्याचे ग्राहकांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले, राजूर, राजूर पोलिस स्टेशन, तहसिल पुरवठा, कृषी उत्पन्न बाजार समिती, पाटबंधारे विभाग, तहसिल विभाग जमीन शाखा, कृषी विभागाच्या पी. एम. किसान आर. टी. एम स्टेट बँक ऑफ इंडिया राजूर, कृषी विभाग पंचायत समिती या विभागाबाबत अनेक तक्रारी आल्या. हया सर्व विभागाच्या तक्रारी सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी सौ मंगल मालुंजकर, प्रा . बाळासाहेब बनकर, संजय नवले, गोकुळ कानकाटे, निलेश साकुरे, किरण चौधरी, दत्ता ताजणे, लालुपुरी, अँड. भाऊसाहेब वाळुंज, राम रुद्रे, कैलास तळेकर, सुदाम मंडलिक, शिवाजी पाटोळे, जालिंदर बोडके, राजेंद्र घायवट, डॉ. नवनाथ आवरी, सुनिल देशमुख, रमेश नाईकवाडी, पांडुरंग पथवे, तुळशीराम कातोरे, हरिभाऊ अस्वले, शुभम खर्डे, बाळासाहेब भोत, केशव कोल्हाळ, रामदास पांडे, मच्छिंद्र चौधरी, लखपती कोटकर,प्रास्ताविक तालुकाध्यक्ष दत्तात्रय शेनकर यांनी मांडले, अर्जाचे वाचन कार्याधक्ष महेश नवले तर आभार रामशेठ रुद्रे, यांनी मानले. नायब तहसिलदार लोहरे, महसूल नायब तहसिलदार गणेश भानावसे, अशोक चौघुले, दिनेश नाईकवाडी, मुख्याधिकारी नगरपंचायत शामकांत जाधव, अनिरुद्ध धुमाळ, दुय्यम निबंधक अतुल कदम व सौं. एन.आर.काळे आदी उपस्थित होते.