महाराष्ट्र

हवामान अभ्यासक “पंजाबराव डख” यांना शासकीय सुविधा देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अकोले प्रतिनिधी
शेतकरी बांधवांच्या बांधापासून ते टीव्ही चॅनेल तसेच सोशियल मीडिया पर्यंत सर्वत्र पंजाबराव डख हे नाव सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.

त्याच कारण देखील तसंच आहे,आजकाल निसर्ग हा लहरी बनला असुन या लहरीपणाचा मोठा फटका शेतकरी राजाला मोठ्या प्रमाणात बसत आहे.तरी मागील काही वर्षांपासून पंजाबराव आपल्या हवामानाच्या अभ्यासावरून पावसाचे भाकीत अगदी अचूक वर्तवून अवघ्या काही मिनिटात सोशियल मीडियाच्या माध्येमातून ३ कोटी शेतकरी बांधवाना विनाशुल्क मार्गदर्शन करत आहे.

त्यांच्या या पुर्वकल्पनेमुळं अनेक शेतकरी बांधव उपाययोजना करून होणारं संभाव्य नुकसान टाळू शकत आहे. यामुळे शेतकरी बांधवांमध्ये पंजाब रावांच्या हवामान अंदाजाची विश्वासहर्ता वाढली आहे.

पंजाबराव हे परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील मौजे गुगळी धामणगाव येथे वास्तव्यास आहेत. खरं पाहता पंजाबराव डख एक शेतकरी कुटुंबातील आहेत. सध्या पंजाबराव डख त्यांच्या गवातील शाळेत अंशकालीन शिक्षक म्हणून कार्यरत असून वेळात वेळ कढून ते शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करत असतात

महाराष्ट्र शासनाने पंजाबरावांच्या या कार्याची दखल घेऊन हवामान अभ्यासाठी त्यांना योग्य त्या शासकीय सुविधा उपलब्ध करून शेतकरी बांधवाना सहकार्य करावे.पंजाबराव ज्या पद्धतीने हवामान अंदाजासाठी ओळखले जातात अगदी त्याच पद्धतीने ते शेती व्यवसायात प्रयोगासाठी देखील ओळखले जातात.म्हणून तर हवामाना अंदाजा बरोबरच शेतकरी बांधवांना शेतीचा सल्ला देखील पंजाबराव देत असतात,म्हणून महाराष्ट्र शासन,कृषी विभागाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा योग्य तो सन्मान करावा अशी मागणी अकोले तालुक्यातील सामाजीक कार्यकर्ते मातोश्री शांताई फाऊंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष तात्यासाहेब देशमुख यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

तात्यासाहेब देशमुख

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button