ग्रामीण

निलेश लंके महीला प्रतिष्ठान तर्फे ” स्त्री जन्मा ही तुझी कहाणी “अभियानांतर्गत जनजागृती !

पारनेर प्रतिनिधी:
सामाजिक कार्यात मतदार संघातच नव्हे तर देश-विदेशात अल्पावधीतच नावारूपाला आलेले तसेच चर्चेचा व कौतुकाचा विषय झालेले पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या लोकोपयोगी कार्यामुळे प्रेरित झालेल्या व सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी निलेश लंके प्रतिष्ठानचा जन्म झाला . या प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात देत निलेश लंके प्रतिष्ठान गरुड झेप घेत असताना , निलेश लंके महिला प्रतिष्ठान ही कोठे कमी पडताना दिसत नाही .
बुधवार दिनांक 12 ऑक्टोबर 2022 रोजी निलेश लंके महिला प्रतिष्ठान पुढे सरसावले व कुरुंद येथील आश्रम शाळेमध्ये निलेश लंके महीला प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित ” स्त्री जन्मा ही तुझी कहाणी “या अभियानांतर्गत शाळेतील विद्यार्थिनींना मोफत शालेय साहीत्य वाटप करत नारी शक्तीचा पुरस्कार करत सावित्रीच्या लेकींचा शालेय साहित्य देऊन सन्मान केला .
या कार्यक्रमाच्या वेळी निलेश लंके प्रतिष्ठान शिरूरच्या महिला अध्यक्ष सौ. वंदनाताई गंधाक्ते ,पारनेर तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेस उपाध्यक्ष सुरेखाताई कोठावळे , प्रवक्त्या ऐश्वर्याताई ढोरजकर , राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हाध्यक्ष कु.राजश्री कोठावळे व निलेश लंके प्रतिष्ठान शिरूरच्या सदस्या मनीषा साठे व आश्रम शाळा शिक्षक वर्ग उपस्थित होते . या कार्यक्रमाचा महत्त्वाचा मुद्दा महिला व मुलींचे मार्गदर्शन ,महिलांवरील अत्याचार , स्त्री भ्रूण हत्या , मासिक पाळी , सॅनिटरी नॅपकिनचा योग्य वापर याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले . तसेच निलेश लंके प्रतिष्ठान महिला कार्यकारणी शिरूर तर्फे मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले .
यापुर्वीही शिरूर येथील न्यू इंग्लिश स्कूल ,
पानोली येथील जि.प. प्राथमीक शाळा येथेही या सामाजिक उपक्रमास उस्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सुरेखा कोठावळे यांनी केले तर प्रास्ताविक
सौ.ऐश्वर्या ढोरजकर यांनी केले व आभार
सौ.वंदना गंधाक्ते यांनी मानले .कू.राजेश्वरी कोठावळे
यांनी सर्व उपस्थित नारीशक्तीला भविष्यात सक्षमपणे जगण्यासाठी नारी आबला नसून सबला आहे यावर उत्कृष्ट असे मार्गदर्शन करत महिला भगिनींमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण केली.यावेळी कुरुंद येथील अनेक माता भगिनी , विद्यार्थी भगिनी , पालक , शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

:
एका यशस्वी पुरुषा मागे एका स्त्रीचा हात असतो . व ही स्त्री भक्कमपणे ज्या पुरुषाच्या पाठीमागे उभी राहते तोच पुरुष इतिहास जमा होतो .हे देशाच्या ऐतिहासिक,शैक्षणिक , राजकीय , सामाजिक , धार्मिक या सह विविध क्षेत्रात पहावयास मिळत आहे . राजमाता जिजाऊ ही एक कार्यक्षम स्त्री पाठी होती म्हणून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आपणास पहावयास मिळाले.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या म्हणून महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचा पाया मजबूत करता आला . व माझ्या माता भगिनींना शिक्षण घेता आले .माता अहिल्याबाई होळकर असो की झाशीची राणी असो मा.पंतप्रधान इंदिरा गांधी असो की अंतराळात झेप घेणाऱ्या कल्पना चावला असो मा.राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आसो की आमदार निलेश लंके यांना साथ देणाऱ्या जि. प.सदस्या राणीताई लंके आसो संपूर्ण विश्वाला गवसणी घालणाऱ्या या स्त्री शक्तीने स्त्री ही पुरुषा बरोबरीने आपले कर्तुत्व सिद्ध करू शकतात हे दाखवून दिले.परंतु एकविसाव्या शतकातही या स्त्री जातीकडे एक आबला म्हणून पाहिले जाते . तिला दुबळी वागणूक दिली जाते.आनेक ठिकाणी अजूनही अनेक जिजाऊ,सावित्री,अहिल्या,राणी लक्ष्मीबाई यांना हे जग पाहण्याच्या आधीच आईच्या गर्भातच संपविले जाते.समाजातील हा संकोचित वृत्तीचा निषेध करत नारीशक्तीने सक्षम पणे या वास्तवाचा सामना करणे गरजेचे आहे . ” स्त्री जन्मा ही तुझी कहाणी “या सदराखाली हे अभियान संपूर्ण मतदार संघात निलेश लंके महिला प्रतिष्ठान मार्फत आम्ही राबविणार आहोत .

सौ.वंदना सतीश गंधाक्ते

(अध्यक्ष-निलेश लंके महिला प्रतिष्ठान शिरूर )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button