राजुर मध्ये महावीर जयंती उत्सव साजरी

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
राजूर येथे भगवान महावीर जयंती निमित्ताने जैन समाजाच्या वतीने गुरु महाराजांच्या उपस्थित विधीमय पूजा करून भव्य मिरवणूक काढण्यात आली. भगवान महावीर संपूर्ण जगाला अहिंसा दया क्षमा शांती मैत्री जगा आणि जगू द्या संदेश देणारे आज त्यांचे जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढणेत आली होती
महावीर जयंतीनिमित्त राजूर येथील गुजराती, जैन समाजबांधवांनी मंगळवारी सकाळी पार्श्वनाथ भगवान मंदिरात नित्याची पाठ केली. यानंतर महाआरती करण्यात आली.
गुरू महाराज यांच्या प्रवचनाने सकाळच्या कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर विश्वस्त प्रकाश शाह आणि शशिकांत ओहरा यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी चार वाजता भगवान महावीर यांच्या प्रतिमेची राजूर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत वादयाच्या गजरात तरुणाईने टिपरी नृत्य सादर केले, यात महिलांनीही आपला सहभाग नोंदवला.महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी टिपरी पथक सर्वांनी ठेका धरून मिरवणूक चे आकर्षण ठरले होते. नेहमीच शिस्त मय असणारे जैन बांधव आज मिरवणुकी मध्ये शिस्तमय दाखवून दिले तसेच महिला ही मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुनील शेठ शहा,पंकज ओहरा,सुधीर ओहरा, ब्रिजेश् ओहरा अल्पेश् मेहता शैलेश ओहराअनिकेत शहा,परेश ओहरा हर्षद ओहरा, दर्शन ओहरा निखिल मेहता, साहिल मेहता आदी सह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
