कोंकणमहाराष्ट्र
पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान!

हेमंत सुरेश देशमुख
उरण /रायगड जिल्हा –
: पोलीस उपनिरीक्षक श्री संजय रामचंद्र पवार यांचा पोलीस प्रशासनात उत्तम कामगिरी केल्या बद्दल राज्यपाल श्री कोशियारी यांच्या हस्ते काल दि. १३/१०/२०२२ रोजी राजभवन येथे सन्मानित करण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक श्री संजय रामचंद्र पवार सध्या उरण वाहतूक विभागात कार्यरत आहेत.३२ वर्षे प्रामाणिक सेवा आणि अनेक गुन्ह्यांची उकल केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या सन्माना बद्दल उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील साहेब, सरचिटणीस संतोष पवार साहेब यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे