आजचे पंचांग व राशिभविष्य दि १५/१०/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आश्विन २३ शके १९४४
दिनांक :- १५/१०/२०२२,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२४,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:०६,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- शरदऋतु
मास :- आश्विन
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- षष्ठी अहोरात्र,
नक्षत्र :- मृग समाप्ति २३:२२,
योग :- वरीयान समाप्ति १४:२४,
करण :- गरज समाप्ति १७:५६,
चंद्र राशि :- वृषभ,(१०:१नं. मिथुन),
रविराशि – नक्षत्र :- कन्या – चित्रा,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- मंगळ – मिथुन ३०:३१,
शुभाशुभ दिवस:- सामन्य दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०९:१९ ते १०:४७ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:५२ ते ०९:१९ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०१:४३ ते ०३:१० पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:१० ते ०४:३८ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
यमघंट २०:४७ प.,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आश्विन २३ शके १९४४
दिनांक = १५/१०/२०२२
वार = मंदवासरे(शनिवार)
मेष
आज तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील. नोकरीशी संबंधित काही बदल हवा असेल, तर ती इच्छाही पूर्ण होईल. कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी मनातील बोलणे टाळावे लागेल. एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता. तुमच्या बालपणीच्या काही आठवणी ताज्या होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. अचानक धनलाभ झाल्याने आनंदी व्हाल.
वृषभ
आजचा दिवस आयुष्याला नवी दिशा देईल. काही बाबतीत नेतृत्व कराल ज्यात, इतर लोकांचेही सहकार्य असेल. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर संभाषणही होईल आणि तुम्हाला तुमचे मत मांडण्याची संधी मिळेल. तुमच्या विचारांना महत्त्व मिळेल. काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल, जे भविष्यात उपयोगी पडेल. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. सर्व कामे पूर्ण होतील.
मिथुन
आज तुम्हाला तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. भावनेच्याभरात फसण्याऐवजी तुम्ही समजूतदार व व्यावहारिक व्हा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, या विश्वासाने तुम्ही पुढे जाऊ शकाल. वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही ठिकाणी वाद घालण्याची ही वेळ नाही. शांत राहण्याचा प्रयत्न करा. बोलण्यात संयम बाळगा.
कर्क
आज तुमच्या चांगल्या विचाराने तुम्ही कुटुंबातील एखाद्या सदस्याबाबत महत्त्वाचा निर्णय घ्याल, परंतु कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबातील इतर सदस्यांशी जरूर बोला. कोणाचे ऐकून त्यावर अवलंबून राहून कोणताही निर्णय घेऊ नका. तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. जर, तुम्ही एखाद्यावर काही जबाबदारी सोपवलीत, तर ते वेळेत पूर्ण होईल.
सिंह
आज चांगल्या कामांमध्ये भाग घ्या. काही नवीन लोकांशी तुमची ओळख होईल. यामुळे हे लोक आगामी काळात तुमच्या कामी येऊ शकतात आणि तुम्हाला तुमच्या कामात यशस्वी होण्यासाठी मदत करू शकतात. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यवान असेल. काही चांगली बातमी मिळू शकते. सरकारी योजनेचा लाभ मिळू शकतो. रागावर नियंत्रण ठेवा.
कन्या
मन प्रसन्न राहील. वैवाहिक सुखात वाढ होईल. अध्यात्माकडे कल वाढू शकतो. कार्यक्षेत्रात वाढ होऊ शकते. कामाचा भार जास्त होईल. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. कुटुंबात सुख-शांती राहील. व्यवसायाच्या विस्तारासाठी मित्राचे सहकार्य मिळू शकते. स्वावलंबी व्हा. आरोग्याबाबत जागरुक राहा. कुटुंबातील सदस्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
तूळ
तुमच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. मालमत्तेची गुंतवणूक आणि योग्य हेतूने केलेला व्यवसाय या दोन्हीमुळे तुम्हाला दीर्घकाळ नफा मिळेल. जर, तुम्ही आज गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही अशा क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, ज्यामध्ये तुम्हाला दीर्घकालीन लाभ मिळतील. कोणतेही काम करण्यापूर्वी सावधगिरी बाळगा.
वृश्चिक
आज तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. कामाच्या ठिकाणी नफा न मिळाल्याने थोडे दु:खी व्हाल. जर, तुम्ही याआधी एखाद्याला पैसे उधार दिले असतील, तर आज ते परत मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात अनुकूल परिस्थितीमुळे कोणतेही अवघड काम वेळेवर सहज पूर्ण करू शकाल. सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक आज मनापासून लोकांना मदत करतील.
धनु
आजचा दिवस संमिश्र जाणार आहे. जुन्या मित्राला भेटायला जाल, जुन्या आठवणी ताज्या होतील. प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला थकवा आणि तणाव जाणवू शकतो. चांगला आहार तंदुरुस्त राहण्यास मदत करेल. मुलांसोबत थोडा वेळ घालवू शकता. खाजगी शिक्षक आज मुलांना अभ्यासाच्या नवीन पद्धती शिकवतील, विद्यार्थ्यांची अभ्यासाची आवड वाढेल.
मकर
अतिउत्साही होणे टाळा, अन्यथा तुम्ही घाईत काहीतरी चुकीचे काम करू शकता. कार्यक्षेत्रात तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल, त्यामुळे येणाऱ्या अडचणी दूर होतील. आज तुम्हाला व्यवहाराशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू शकतो. काही विरोधक आज सक्रिय असतील, ज्यांच्यापासून तुम्हाला सावध राहावे लागेल.
कुंभ
भांडवल गुंतवण्यापूर्वी खाजगी स्तरावर कंपनीची कायदेशीरता तपासून घ्या. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. वारंवार व्यवसायातील चढ-उतार, घरगुती वाद आणि सामंजस्याचा अभाव यामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. पालकांच्या पाठिंब्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते.
मीन
आज तुमच्या दिवसाची सुरुवात नव्या आशेने होणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील. कला आणि साहित्य क्षेत्रातील लोकांसाठीही आजचा दिवस चांगला राहील. विद्यार्थ्यांना करिअरची चिंता सतावेल. आपले कौशल्य दाखवण्याची सुवर्ण संधी मिळेल. या संधीचा नक्की लाभ घ्या.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर