इतर

आमदार लंके यांच्या प्रयत्नांना यश !ढवळपुरी येथील दुर्गम भागात प्रथमच फिरली लाल परी !

दत्ता ठुबे

पारनेर प्रतिनिधी :
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होऊन गेले तरीही पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील दुर्गम भागात आजपर्यंत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस ( लालपरी ) फिरकली नव्हती.आमदार निलेशजी लंके यांच्या प्रयत्नातून तसेच युवा नेते दीपक (आण्णा ) लंके यांच्या पाठपुराव्यातून ढवळपुरीचे सरपंच, उपसरपंच ,सेवा सोसायटीचे चेअरमन संचालक तसेच सर्व पदाधिकारी व हितचिंतक यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ढवळपुरी गावातील वाडीवस्तीवर विद्यार्थी मित्र व ग्रामस्थांना आपल्या दैनंदिन कामकाजासाठी तालुक्याच्या व जिल्ह्याच्या गावी जाण्यासाठी होणारी ससेहोलपट पाहता आमदार यांचे जेष्ठ बंधु दिपक आण्णा लंके यांनी आगार प्रमुख अमोल कोतकर साहेब यांच्याशी वारंवार लेखी व तोंडी स्वरूपात केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले व तालुक्याच्या इतिहासात प्रथमच ढवळपुरी गावच्या वाडीवस्तीवर लालपरी सुरु झाली .
यावेळी युवा नेते दिपक लंके यांच्या समवेत
दीपक अण्णा लंके,पारनेर आगार प्रमुख कोतकर साहेब, वाहतुक नियंत्रक संतोष ठुबे,सरपंच नंदा भागाजी गावडे, चेअरमन सुखदेव चितळकर, चेअरमन भागाजी गावडे,अजित सांगळे सर, सरपंच हंगा सुरेश रासकर,चेअरमन निवृत्ती थोरात,तुकाराम चितळकर, किरण गव्हाणे, संदीप भागवत,ग्रामपंचायत सदस्य रमेश केदारी,ग्रामपंचायत सदस्य संदीप थोरात, संतोष साळवे, भास्कर भिडे,शब्बीर शेख, अहमद पटेल,तुषार साळवे, भास्कर भालेराव, श्याम पवार, तिखोलचे सरपंच अनिल तांबडे, संतराम कुटे,बंडु जाधव, जानकु वाव्हळ,एकनाथ सांगळे, कारभारी वाव्हळ गुरुजी,संदिप महांडुळे,संतोष व्यवहारे,कैलास मोकळे,सहादू भोंडवे,सतिष इंगळे,फारुख शेख,सुभाष अडसूळ,दादासाहेब रोकडे,निरज बो-हाडे संदिप खिलारी,राम चौरे,विश्वनाथ चौधरी सह ढवळपुरी गावच्या वाडी वस्ती वरील ग्रामस्थ व विद्यार्थी मित्र या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button