सोनई पोलीस स्टेशन मध्ये विविध गुन्ह्यातील नऊ आरोपींना अटक.

शनिशिंगणापूर/ प्रतिनिधी
— सोनई पोलीस ठाण्यात विशेष मोहीमेंतर्गत एन बी डब्ल्यू वारंट मधील नऊ आरोपींना सोनई पोलिसांनी अटक केली . प्रथम वर्ग न्यायालय नेवासा व जिल्हा अति सत्र न्यायालय नेवासा यांचेकडून विविध गुन्ह्यातील प्राप्त एन बी डब्ल्यू वारंट मधील नऊ आरोपींना वरिष्ठांच्या आदेशानुसार मोठ्या शिताफीने अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. तसेच बि डब्ल्यू वारंट मधील पाच आरोपींना वारंट बजावत कोर्टात हजर राहण्या बाबत कळविण्यात आले आहे. सदरील कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल , स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर , संदीप मिटके चार्ज उप विभागीय अधिकारी शेवगाव यांचे मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी , पोलीस हे. काॉ. आव्हाड, पो.हे.काॅ. गावडे, पो.हे. काॅ. गायकवाड, पो.हे.काॅ. लबडे पो. काॅ. थोरात, पो. काॅ. म्रुत्युजंय मोरे, पो. काॅ. जवरे,पो.काॅ.ठोंबरे, पो. काॅ. आघाव, पो. काॅ. निखिल तमनर यांनी ही कार्यवाही केली