गोमळवाडी येथे विहीरीत पडलेला बिबट्या जेरबंद करण्यात वनविभाला यश .

दत्तात्रय शिंदे
नेवासा तालुक्यातील गोमळवाडी येथील
बापूराव पुंजाजी गाडेकर हे कसत असलेले
जोगेश्वरी माता देवस्थानच्या इनामी शेत गट नं.
७१/१ मधील जुन्या कोरडया विहरीत पडलेला
बिबट्या जेरबंद करण्यात वनविभाला यश आले.
शुक्रवार (दि. १४ )रोजी सकाळी राजाराम बापूराव गाडेकर हे शेतात चारा काढण्यासाठी गेले असता
जुन्या विहरित पाणीआले की नाही बघण्यासाठी विहरी जवळ गेले असता कोरड्या विहरित त्यांना बिबट्या दिसून आला.
ही माहिती त्यांनी इतरांना सांगितली नंतर विहिरीत बिबटया पडल्याची बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली
पंचक्रोशीतील नागरिकांनी विहरी भोवती मोठ्या
प्रमाणात गर्दी केली होती. सकाळी ६.३० वाजता
विहिरीत आढळलेला बिबट्या दुपारी २.४५ वाजता
जेरबंद करण्यात आला.
नेवासा बिटचे वनरक्षक राहुल शिसोदे, मुश्ताक
सय्यद, वनपाल देविदास पातारे, चांगदेव ढेरे,
सयाजी मोरे, भीमराज पाठक, घोरपडे, यांनी
विहरित पिंजरा सोडून मोठ्या शिताफीने बिबट्यास
जेरबंद केले.ग्रामसेवक एस. बी. शिंगारे, डॉ.
सुदाम आरसुळे, उपसरपंच विजय जाधव
, बाळासाहेब क्षीरसागर, बापूराव गाडेकर यांनी यावेळी
विशेष सहकार्य केले
इमामपूरचे का.पोलीस पाटील सुधाकरकाळे, संतोष यादव, शंकर दिघे, विनायक गव्हाणे,पत्रकार बाळासाहेब चौधरी आदीसह परिसरातील नागरिक घटनास्थळी उपस्थित होते.