एस.एम.बी.टी. च्या सांडपाण्याने परिसरातील शेती व आरोग्य धोक्यात !

रुग्णालयातील स्थानिकांचे प्रश्न तात्काळ सोडवा : मनसे चे प्रशासनाला निवेदन
सर्वतीर्थं टाकेद दि १७ : उत्तर महाराष्ट्रात नव्हे तर राज्यभरात शिक्षण आणि आरोग्यासाठी प्रचलित असलेल्या एस एम बी टी सेवाभावी ट्रस्टला ईगतपुरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेच्या वतीने विविध मागण्या स्थानिकांचे प्रश्न या संदर्भात निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार कामगार तरुणांना पन्नास टक्के रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा,तालुक्यातील स्थानिक विद्यार्थ्यांना नवीन प्रवेश प्रक्रियेसाठी ५०% आरक्षित कोटा उपलब्ध करून देण्यात यावा व प्रवेश प्रक्रियेत होतकरू गोरगरीब विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे,आपल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची होत असलेली हेळसांड गैरसोय थांबविण्यात यावी,आपल्या रुग्णालयातील कामगारांची पॉलिसी दर पाच वर्षांनी बदलते परंतु २०१४ पासून ते आजपर्यंत पॉलिसी बदलल्या गेली नाही.बदल झाला असेल तर तो नवीन कामगारांचाच का.? जुन्या कामगारांची का नाही ? आपल्याकडे कार्यरत असलेल्या कामगारांना जॉइण्ड पत्र दिले नसेल तर ते देण्यात यावे,व प्रत्येक कामगारांची विमा फाईल देण्यात यावी,जुन्या कामगारांच्या वेतनात वाढ करण्यात यावी,आपल्या रुग्णालयातील सांडपाणी हे शेजारील जाधववाडी,लोहरेवाडी,घोटी खुर्द भागातील परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे परिणामी यामुळे येथील शेतकरी बांधवांचे शेतीसह आरोग्य धोक्यात आले आहे या कारणास्तव दूषित सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात यावे.असे या मागणी निवेदनात म्हंटले आहे.
दरम्यान यावेळी एस एम बी टी सेवाभावी संस्थेचे व्यवस्थापक श्रीराम कुर्हे यांच्याशी मनसे शिष्टमंडळाचे विविधांगी प्रश्नांवर चर्चा झाली.यात मनसेचे आत्मराम मते ,अशोक गाढवे यांनी गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांच्या विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांच्या अनेक विषयांवर चर्चा केली व त्यांच्या असलेल्या समस्या प्रश्न सोडविण्यासाठी मागणी केली.यावेळी एस एम बी टी चे व्यवस्थापक संचालक श्रीराम कुर्हे यांनी सर्व प्रश्न लवकरात लवकरच सोडविल्या जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी मनसेचे विद्यार्थी सेनेचे मा. जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते,मनविसे विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे,चेअरमन चंद्रभान फोकणे,अशोक गाढवे,बाजीराव गायकर,सागर गाढवे,दत्तू शिंदे,धनाजी कोकणे,अंकुश जाधव,प्रकाश वाकचौरे,संदीप रोडे,आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते