
अमृतसगर दूध संघाने 11 कोटी 42 लाख बँकेत केले वर्ग
———-
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्याची शिखर संस्था समजल्या जाणार्या अमृतसागर सहकारी दुध व्यावसायिक व प्रक्रिया संघाने तालुक्यातील दुध उत्पादक शेतकर्यांना दिवाळी निमीत्त प्रति लिटर दोन रूपये रिबेट विनाकपात देण्याचा निर्णय करीत रिबेट सह पंधरवाडा दुध बिल, संघ कर्मचार्यांना बोनस असे एकुण रू. 11 कोटी 42 लाख बँकेत वर्ग केल्याची माहिती माजी आमदार व दुध संघाचे चेअरमन वैभवराव पिचड यांनी दिली आहे.
अमृतसागर दुध संघाच्या 46 व्या वार्षिक सभेत पिचड यांनी दुध उत्पादक शेतकर्यांची दिवाळी गोड करण्याची ग्वाही दिली होती. आज संघाच्या संचालक मंडळाच्या झालेल्या मासिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
वर्षभरामध्ये सुमारे 2 कोटी 94 लाख लिटर दुधावर प्रती लिटर दोन रूपये प्रमाणे संघ रिबेट देत असुन, यापोटी सुमारे रू. 5 कोटी 46 लाख दुध उत्पादक शेतकर्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येत आहे. तसेच पंधरवाडा दुध बिलापोटी सुमारे रू. 3 कोटी 98 लाख तर दुध संघ कर्मचार्यांना 20 टक्के बोनसपोटी व पगारा पोटी रू. 43 लाख 87 हजार रूपये देण्यात येणार आहेत. संघाच्या माध्यमातुन तालुका अंतर्गत व बाह्य दुध वाहतुक ठेकेदारांच्या बिलापोटी रू. 16 लाख देण्याचा निर्णयही बैठकीत घेतला . रिबेट चा लाभ तालुक्यातील सुमारे 30 हजार दुध उत्पादक शेतकर्यांना होणार असल्याचे पिचड म्हणाले
तालुक्यात एकुण 139 सहकारी दुध संस्था असुन 150 दुध संकलन केंद्र आहेत. या माध्यमातुन दैनंदिन सरासरी 85 हजार लिटर दुध संकलन होत असते.
0
——–