हरिश्चंद्रगड येथे वन्यजीव सप्ताह उत्साहात ….डॉ.डी.वाय. पाटील महाविदयालय आकुर्डी महाविद्यालयातर्फे उपक्रम

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , महाराष्ट्र शासन वन्यजीव विभाग भंडारदरा, व डॉ.डी.वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालय आकुर्डी व डॉ . डी . वाय . पाटील विज्ञान व संघणक शास्त्र महाविद्यालय आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यामाने वन्यजीव सप्ताहानिमित्त शैक्षणिक अभ्यास दौऱ्याचे आयोजन हरिशचंद्रगड या ठिकाणी करण्यात आले.
या अभ्यास दौऱ्यावेळी वन्यजीव विभाग भंडारदराचे अधिकारी मा.डी.डी. पडवळे, डॉ .डी.वाय. पाटील महाविदयालय आकुर्डी चे प्राचार्य डॉ.मोहन वामन उपस्थित होते. या अभ्यास दौऱ्यात विविध वनस्पतींचा तसेच
जैवविविधतेचा अभ्यास करण्यात आला .

निसर्गवाचन करताना वन्यजीव रक्षणासाठी जंगलाचे रक्षण करणे आवश्यक आहे व याकरिता जंगलरक्षणाची शपथ घेतली . या अभ्यास दौऱ्याचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. पी. डी. पाटील , उपाध्यक्ष मा. डाॕ. भाग्यश्रीताई पाटील, सचिव मा. डॉ. सोमनाथदादा पाटील, खजिनदार डाॕ. यशराज पाटील यांच्या मागदर्शनाखाली करण्यात आले. या अभ्यास दौऱ्याच्या आयोजनात डॉ . मुकेश तिवारी , प्रा . सतीश ठाकर , प्रा . भागवत देशमूख ,प्रा . खालीद शेख तसेच इतर प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला .