एक लाखाची लाच घेताना वीज वितरणचा अधिकारी अँटी करप्शन च्या जाळ्यात!

पालघर प्रतिनिधी
कामांचे बिल मंजूर करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यासाठी एक लाखाची लाच मागणाऱ्या वीज वितरण च्या उपकार्यकारी अभियंता, म.रा.वि.म, वाडा ता. वाडा जि.पालघर (वर्ग २) याला अँटी करप्शन च्या पथकाने रंगेहात पकडले
. यातील तक्रारदार यांनी म.रा.वि.म. वाडा अंतर्गत केलेल्या विविध कामांचे बिल मंजुर होणेकरिता सदर बिल सही करुन वरिष्ठ कार्यालयात पाठविणेकरिता आरोपी वाडा जिल्हा पालघर येथील म रा वि म चे उपकार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर रघुनाथ वट्टमवार, याने तक्रारदार यांचेकडे १,००,०००/- रु.लाचे ची मागणी केली होती म्हणून तक्रारदार यांनी एसीबी पालघर येथे तक्रार दिली.त्याअनुषंगाने ज्ञानेश्वर रघुनाथ वट्टमवार,याचे कार्यालयात पडताळणी करणे करीता दि १८/१०/२०२२ रोजी सायंकाळी ७:०२ वा. सापळा लावला असता तक्रारदार यांचेकडून १, ००, ००० रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना उपकार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर रघुनाथ वट्टमवार याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या अधिकाऱ्यास ए सीबी ने ताब्यात घेतले असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.
. .श्री.पंजाबराव उगले, अपर पोलिस आयुक्त, ठाणे तथा पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र( अतिरिक्त कार्यभार) श्री अनिल घेरडीकर, अपर पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली
नवनाथ जगताप, (पोलिस उपअधीक्षक), स्वपन बिश्वास, (पोलीस निरीक्षक,)पोह/संजय सुतार, पोहवा/विलास भोये, मपोह/निशा मांजरेकर, पोहवा/अमित चव्हाण, पोहवा/नवनाथ भगत, चापोना/ सखाराम दोडे
या सापळा पथकाने ही कारवाई केली
पालघर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
————+++++++++———-
अँन्टी करप्शन ब्युरो,ठाणे, कॅम्प पालघर
पोलीस उप अधीक्षक नवनाथ जगताप
मो.नं. 9923346810/ 9850158810
पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास
मो.नं. 8007290944/ 9405722011@ टोल फ्रि क्रं. 1064