श्री बाळेश्वर विद्यालयात पालक – शिक्षक मेळावा संपन्न

संगमनेर प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे, श्री बाळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सारोळे पठार या विद्यालयांमध्ये पालक शिक्षक सहविचार सभा घेण्यात आली.या सहविचार सभेमध्ये विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून पालक व शिक्षक यांनी नेहमीत विद्यार्थ्यांच्या अडचणी,समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करावेत.या सहविचार सभेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली.यामध्ये अध्यक्ष अमित फटांगरे व उपाध्यक्ष रामदास गाजरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या सहविचार सभेत विद्यालयाचे कामकाज उल्लेखनीय असल्याने पालकांनी सर्व शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले.त्याच बरोबर विद्या लयात पालकांच्या सुचने नुसार विद्यार्थ्यांसाठी महिन्यातून एक मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात यावे.पालकांनी आपला थोडा वेळ पाल्यांसाठी द्यावा.स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन व्हावे .विद्यार्थ्यांना पालकांनी शाळेत मोबाईल देऊ नये.पालक मेळावा दर तीन महिन्यांनी घ्यावा .पालक,विद्यार्थी व शिक्षक समन्वय ठेवावा.या विषयांवर चर्चा करून सर्वांचे एकमत झाले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री .रमेशचंद्र बेनके, पर्यवेक्षक सुनिल साबळे,जेष्ट शिक्षक भारत हासे, विश्वास पोखरकर,गंगाधर पोखरकर तसेच पालक प्रशांत घुले, डाॕ.मोमीन सय्यद,दत्तात्रय घुले,बबन घुले,विनय फटांगरे,अमोल आरगडे,विठठल घुले, रामचंद्र फटांगरे,रामभाऊ लंके,राधाकिसन घुले, घुले,पोपट फटांगरे,गणपत फटांगरे,भिका फटांगरे,राजेंद्र पोखरकर,सुदाम फटांगरे, गंगाराम गोडे,विश्राम घुले,योगेश फटांगरे,जयशिंग पोखरकर, अशोक फटांगरे,शकुंतला फटांगरे,संदीप घुले, भाऊराव पांडे,राजेंद्र फटांगरे,अशोक फटांगरे, अशोक कडू तसेच शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते अशा प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात पालक शिक्षक सभा संपन्न झाली