ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन संपन्न.

राजूर/प्रतिनिधी-
राजूर येथील ॲड.एम.एन.देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राजूर येथे महाविद्यालयातील वाणिज्य मंडळाचे उद्घाटन आज दिनांक १८/१०/२०२२ रोजी प्राचार्य डॉ.अरूण गायकवाड(संगमनेर महाविद्यालय संगमनेर) यांच्या हस्ते संपन्न झाले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी दिली आहे.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भाऊसाहेब देशमुख हे उपस्थित होते. आपल्या उद्घाटन पर भाषणात प्राचार्य डॉ अरूण गायकवाड म्हणाले की,
” वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी स्टार्टअपच्या माध्यमातून आदिवासी भागामध्ये उद्योग निर्मितीची सुवर्णसंधी आहे. संघर्षातून माणूस मोठा होतो, त्यासाठी आजच्या तरुणांनी संघर्ष केला पाहिजे. सर्वांगीण विकास चार भिंतीत होत नाही, तरुणांनी सर्वांगीण विकासासाठी चार भिंतीच्या बाहेर पडून शिक्षण घेतले पाहिजे. आजचा तरुण समाजाचे काही देणे लागतो. ग्रामीण भागातील तरुणांनी स्वतःला कमी लेखू नये संस्काराची शिदोरी घेऊन आपण यशाची शिखरे गाठू शकतो त्यासाठी तरुणांनी आपल्या मनातील न्यूनगंड बाजूला ठेवून संघर्ष करून यशाची शिखरे गाठली पाहिजे.सोशल मीडियाचा वापर फक्त सकारात्मक गोष्टींसाठीच करावा. असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

आपल्या पुढील भाषणात ते म्हणाले की,” तुम्ही स्वतः तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात, हे लक्षात ठेवून आजच्या तरुणांनी प्रयत्न केले पाहिजे.आपण टुरिझमच्या दृष्टिकोनातून विचार करावा थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार केला की त्यातून नवनिर्मिती होते.तरुणांनी स्वप्न पाहून ती यशस्वी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.” याप्रसंगी त्यांनी अनेक यशस्वी उद्योजकांची विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथींचा परिचय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.वाय.देशमुख यांनी केला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अस्वले एस. आर. यांनी केले, कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. कढणे आर.ए.यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रा. टी.एच. सावंत प्रा. कुसमुडे जी.एस. व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.