महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृहात दीपोत्सव २०२२ संपन्न

पुणे दि२०
तिमिरातून तेजाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. दीपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव. अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीपक-दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो.
दिवाळीचे औचित्य साधून बुधवार १९ आॅक्टोबर २०२२ रोजी संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या वेळात महिलाश्रम वसतिगृहामध्ये मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करण्यात आला.

या दीपोत्सवमध्ये वसतिगृहातील सर्व मुलींनी आणि व सेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
महीलाश्रम वसतिगृहाच्या परीसरात वेगवेगळया संकल्पना साकारून दीपोत्सव साजरा करण्यात आला.यामध्ये मुख्य विषय स्वातंत्र्याची ७५वर्ष अर्थात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ हा विषय होता.
सुरूवात महर्षी आण्णांच्या समाधीपासून करण्यात आली. अण्णांच्या बागेमध्ये अनेक दीप लावून फुलांची सुंदर व आकर्षक रांगोळयांंनी सजावट करण्यात आली होती . आजच्या उत्सवाने अण्णांची बाग दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाली.

यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष मा. रविंद्र देव, उपकार्याध्यक्षा मा. विद्याताई कुलकर्णी, संचालक मा.अभय कुलकर्णी, मा. सिमा कांबळे सचिव मा. पी. व्ही. एस. शास्त्रीसर, उपसचिव मा प्रदीप वाजे, मा. गिरीश हुद्दार, प्रदीप जोशी, श्रीपाद कुलकर्णी, शाखांचे प्रमुख, सेवक तसेच विद्यार्थिनीं उपस्थित होते
मुलींनी बनविलेल्या छोट्या छोट्या आकाशकंदीलाची सर्व ठिकाणी सजावट करून अनेक दिवे लावण्यात आले. तसेच यानिमित्ताने मुलींनी ऐतिहासिक वारसा जपण्याच्या उद्देशाने सुंदर आणि आकर्षक असा मल्हार किल्ला बनवून त्याची संपूर्ण माहिती आलेल्या पाहुण्यांना दिली.
महर्षी आण्णांची संपूर्ण मूळ झोपडी दिव्यांनी आणि विद्युत रोषणाईने सुशोभित करण्यात आली. झोपडीसमोर अनेक पानाफुलांची रांगोळी काढून सजावट करण्यात आली. सर्व ठिकाणी स्वातंत्र्याची 75 वर्षे ही संकल्पना घेऊन आकर्षक रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या. .अशाप्रकारे दीपोत्सवाचा कार्यक्रम आनंदाने, उत्साहाने ,अतिशय प्रसन्न आणि प्रकाशाच्या तेजात .
संपन्न झाला.