आजचे पंचांग व राशिभविष्य दि २०/१०/२०२२

🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आश्विन २८ शके १९४४
दिनांक :- २०/१०/२०२२,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२५,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:०२,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- शरदऋतु
मास :- आश्विन
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- दशमी समाप्ति १६:०५,
नक्षत्र :- आश्लेषा समाप्ति १०:३०,
योग :- शुभ समाप्ति १७:५२,
करण :- बव समाप्ति २८:४९,
चंद्र राशि :- कर्क,(१०:३०नं. सिंह),
रविराशि – नक्षत्र :- तुला – चित्रा,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- दु. ०४नं. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०१:४१ ते ०३:०८ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०६:२५ ते ०७:५३ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:१४ ते ०१:४२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०१:४१ ते ०३:०८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०४:३५ ते ०६:०२ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
घबाड १०:३० प., भद्रा १६:०५ प., दशमी श्राद्ध,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आश्विन २८ शके १९४४
दिनांक = २०/१०/२०२२
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)
मेष
आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी असणार आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. प्रलंबित प्रकरणांकडे पूर्ण लक्ष द्यावे लागेल आणि कोणत्याही कायदेशीर प्रकरणात नियमांचे पूर्णपणे पालन करावे लागेल, अन्यथा तुम्हाला त्यासाठी दंड होऊ शकतो. प्रवासात तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळेल.
वृषभ
आज आपण कुटुंबीयांच्या अपेक्षा पूर्ण करताल. मनाला शांती लाभेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळाल्याने आर्थिक समस्या दूर होईल. सर्जनशील कार्य करण्याची संधी मिळेल. दिवाळीनिमित्त घरात स्वच्छतेवर भर दिला जाणार असून, सणानिमित्त जवळच्या व्यक्तीचे आगमन झाल्याने आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या सल्ल्याचे पालन करणारी व्यक्ती कार्यक्षेत्रात चांगले परिणाम देईल.
मिथुन
आज दिवसभर शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि राग टाळा. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. कामाच्या ठिकाणी कष्टाचे होऊ शकते. कुटुंबात मान-सन्मान मिळेल. आत्मविश्वास भरपूर असेल. वाचनाची आवड निर्माण होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. वाणीच्या प्रभावामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. मन चंचल राहील. धार्मिक कार्यावर खर्च वाढू शकतो. मित्रांच्या मदतीने व्यवसाय वाढू शकेल.
कर्क
कुटुंबातील एखाद्या सदस्याला नवीन नोकरी मिळू शकते. व्यवसायात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. जोडीदारासोबत प्रवासाची योजना आखू शकता. भौतिक वस्तूंमध्ये रुची वाढेल. भेटवस्तू मिळतील आणि सन्मान वाढेल. सर्जनशील प्रयत्नांना फळ मिळेल. सामाजिक कार्यात रस घ्याल.
सिंह
सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस परस्पर बंधुभावाचा राहील आणि नवीन अनुभव मिळतील. हे नवीन अनुभव भविष्यात खूप फायदेशीर ठरतील. प्रयत्नांना यश मिळेल. एखादी चांगली योजना तयार केली जाईल. अपेक्षेप्रमाणे आर्थिक परिस्थिती चांगली राहील. एखाद्याच्या गोपनीयतेचा भंग करू नका. प्रतिस्पर्ध्याचा पराभव होईल. कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नका. आर्थिक बाबतीत प्रगती होईल.
कन्या
आज एखादे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या शांत असाल. वेळ खूप महत्वाचा आहे, कृपया तो सत्कारणी लावा. जर, तुम्ही नवीन घर किंवा मालमत्ता घेण्याचा विचार करत असाल, तर तुमचा निर्णय अतिशय योग्य आहे. कामाचा व्याप वाढणार आहे. परिश्रमापेक्षा परिणाम कमी असेल. विद्यार्थ्यांनी विचार आणि समजून घेण्यात जास्त वेळ दिल्यास कोणतीही संधी वाया जाऊ शकते.
तूळ
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. जर, तुम्ही मुलांच्या करिअरची काळजी करत असाल तर, चिंता करण्याची गरज नाही. उत्पन्नाचे विविध स्त्रोत देखील उपलब्ध होतील. परंतु, खर्चात देखील वाद होईल. आपल्याला आर्थिक समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते. जे विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छितात, त्यांची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते. व्यवहाराच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल.
वृश्चिक
आज आपण हवेते काम करण्यात उत्सुक असाल. हा काळ तुमच्यासाठी प्रभावी ठरेल. ऑफिसच्या कामावर तुमची पकड कायम ठेवावी लागेल. तुमचे उत्पन्न वाढू शकते आणि तुम्हाला अचानक आर्थिक लाभ किंवा बक्षीस मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि दिवाळीची तयारी केली जाईल.
धनु
राग आणि उत्कटतेचा अतिरेक टाळा. नोकरीत अधिकाऱ्यांशी सामंजस्य ठेवा. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. मेहनतही जास्त होईल. स्वावलंबी व्हा. कुटुंब तुमच्यासोबत असेल. व्यवसायात वाढ होईल. मन चंचल राहील. कौटुंबिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. खर्च जास्त होईल. आरोग्याबाबत जागरुक राहा. मित्रांच्या मदतीने तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळेल.
मकर
आज विचारपूर्वक पुढचे पाऊल टाकावे लागेल. आरोग्याबाबत काळजी घ्या. काही शारीरिक वेदना होत असतील, तर त्यात निष्काळजीपणा टाळा. तुम्हाला काही निर्णय अतिशय हुशारीने घ्यावे लागतील. जबाबदारीचे पालन करण्यापासून मागे हटू नका. नोकरी करणाऱ्या लोकांना मनाप्रमाणे काम मिळाल्याने त्यांच्या आनंदाला पारावर उरणार नाही. तुमची साधी विचारसरणी लोकांना आवडेल.
कुंभ
आत्मविश्वास कमी होऊ शकतो. शांत व्हा, राग टाळा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. खर्च जास्त होईल. व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. भावनांवर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागेल. शैक्षणिक कार्यात अपेक्षित यश मिळेल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. प्रगतीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. मालमत्तेत गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.
मीन
आज मीन राशीच्या लोकांना आपल्या अपेक्षांवर नियंत्रण ठेवावे लागेल. काही लोक कुटुंबात आपले म्हणणे सिद्ध करण्यास उत्सुक असतील. सामाजिक कार्यामध्ये भाग घेऊ शकता. दिवाळीच्या निमित्ताने घरात उत्साहाचे वातावरण असेल आणि काही खास पदार्थही बनवता येतील. कामाशी संबंधित चांगल्या आणि व्यावहारिक कल्पना तुमच्या मनात येतील.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर