इतर

पारनेर चे नगराध्यक्ष विजय औटी यांचा तडकाफडकी राजीनामा!


विरोधकांकडून लक्ष होत असल्याने राजीनामा ?


पारनेर – प्रतिनिधी


पारनेर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांनी गुरुवारी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे लेखी पत्र द्वारे सोपविला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष औटी यांनी राजीनामा दिल्यामुळे पारनेर शहरात खळबळ उडाली असून विरोधकांच्या राजकीय कुरघोडी मुळे हा राजीनामा दिला असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. गेल्या सहा महिन्यात शासकीय कामात अडथळ्या सह जुन्या जमीन खरेदीतून त्यांच्यावर पारनेर पोलिस ठाण्यात नगराध्यक्ष विजय औटी यांच्यावर दोन गुन्हे दाखल झालेले आहेत.तर दुसरीकडे इतर माध्यमातूनही त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्याचे1

काम स्थानिक पातळीवर विरोधकांकडून चालू असून विरोधकांच्या या कुरघोडीच्या राजकारणाला उजाचाला कंटाळून राजीनामा दिला असल्याचे त्यांनी तसेच त्यांच्याकुटुंबियांनी बोलताना सांगितले.
या पत्रात नगराध्यक्ष विजय औटी यांनी म्हटले आहे की जेव्हापासून मी पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा कारभार हातात घेतला तेव्हापासून माझी व माझ्या कुटुंबाची प्रतिमा मलीन करण्यासाठी कट कारस्थाने रचू लागले. राजकीय वैमनस्यातून मला नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवरून खाली खेचण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू झाले. अनेक जुनी प्रकरणे काढून माझ्यावर गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न विरोधकांनी केले असून या खोट्या गुन्ह्यांमुळे मी नगराध्यक्ष पदाला वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे नगराध्यक्ष पदाची जर खुर्ची माझ्या कार्यात अडथळा ठरत असेल तर अशा खुर्चीवर मी तुळशीपत्र ठेवून आमदार निलेश लंके यांचा एक कार्यकर्ता म्हणून व राष्ट्रवादी पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून यापुढे काम करणार असल्याचेही नगराध्यक्ष विजय औटी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी बहुमत नसतानाही अपक्ष व भाजपचे नगरसेवकांचा पाठिंबा घेऊन मला नगराध्यक्षपदी विराजमान केले.एका एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाला नगराध्यक्ष पद देऊन माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ताचा आमदार निदर्शने जो सन्मान केला आहे तुम्ही कधीच विसरू शकत नाही. तर नगराध्यक्ष पदाचा कारभार घेतल्यानंतर गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पारनेरच्या पाणी प्रश्नावर ३७ तांत्रिक बाबींचा अडथळा असतानाही आमदार संख्यांच्या माध्यमातून त्यासाठी विशेष प्रयत्न चालू केले होते. परंतु पाण्याच्या प्रस्थापित राजकारण्यांनी मला व माझ्या कुटुंबीयांना लक्ष करून वेळोवेळी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. आमदार निलेश लंके यांनी पारनेरचा चेहरा मला बदलण्यासाठी आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जणू विडाच उचलला होता त्याचाच एक भाग म्हणून गुरुवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी विकास आराखडा मंजूर करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष पद हे जनतेची सेवा करण्याचे एक साधन आहे परंतु ते कधी माझं होऊ शकत नाही ज्याप्रमाणे आमदार निलेश लंके 24 तास 365 दिवस जनतेची सेवा करत असतात त्याचप्रमाणे मी काम करणारा एक सच्चा कार्यकर्ता आहे. माझ्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात अधिका-यांनी, पदाधिकाऱ्यांनी व सर्व नगरसेवकांनी मला जी मोलाची साथ दिली ती महत्त्वाची व अनमोल आहे. माझ्या संकट काळात ज्या नगरसेवकांनी माता माऊलींनी व मतदारांनी जी साथ दिली त्याच्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे व भविष्यातही ऋणी राहील असे भावनिक पत्र नगरपंचायतीचे सीईओ यांना नगराध्यक्ष विजय औटी यांनी राजीनामा पत्र पाठवले आहे.

अखेरच्या श्वासापर्यंत पारनेरच्या

पाणी प्रश्नासाठी लढणार विजय औटी


कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी आमच्या कुटुंबाला नसतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी नगरसेवकांच्या मदतीने पारनेर नगराध्यक्ष पदाची माळ माझ्या गळ्यात घातली. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा जरी मी राजीनामा दिला असला तरी शेवटच्या श्वासापर्यंत पाण्याचा प्राणी प्रश्न तडीस नेण्यासाठी आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून काम करणार आहे. पारनेरच्या जनतेची सेवा एक सर्वसामान्य कार्यकर्ता एक नगरसेवक म्हणून यापुढील करणार असून राजकीय कुरघोडीचा व विरोधकांच्या कुटनीतिचा मी बळी ठरला असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्ष विजय अौटी यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button