इतर

दोन पिढ्यांची अनोखी प्रेमकथा सांगणाऱ्या ‘आठवणी’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

कथेच्या शोधात निघालेला तो आणि या प्रवासात त्याला गवसलेली भावनिक गुंतागुंत आणि ओढ व त्यातून साकारलेली प्रेमकथा म्हणजे ‘आठवणी’! या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आणि तेव्हापासूनच प्रेक्षकांना प्रतिक्षा होती ती या चित्रपटाच्या ट्रेलरची आणि आता ती प्रतिक्षा संपली आहे, कारण आज ‘आठवणी’ चा खास ट्रेलर रिलीज झाला.

चित्रपटाच्या पोस्टरवर ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, सुहृद वार्डेकर आणि वैष्णवी करमरकर यांचे फोटो बघूनच चित्रपट नक्की काय असेल? याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. एका कथेच्या शोधात निघालेला लेखक, त्याला हवी तशी गोष्ट न सापडल्याची तळमळ आणि अशातच त्याच्या हाती लागलेलं एक खास पत्रं… या पत्रामुळे त्याचं, त्याच्या जोडीदाराचं बदलून गेलेलं आयुष्य. हाती लागलेल्या पत्रामुळे दूर गेलेल्या सच्चा प्रेमिकांचा शोध आणि या सगळ्या प्रवासात त्याला मिळालेलं समाधान… याचं चित्र उलगडून दाखवणारा हा ट्रेलर आहे. दोन पिढ्यांची प्रेमकथा या चित्रपटातून उलगडणार आहे. एकीकडे दिग्गज कलाकार आणि दुसरीकडे नवोदित कलाकारांचे सुंदर असे समीकरण या चित्रपटात जुळून आलेले आहे. याशिवाय अभिनेता निनाद सावंत सहाय्यक भूमिकेत दिसेल. चित्रपटातील पत्रातून होणारा संवाद अगदी वेगळ्या प्रकारे दिग्दर्शक सिद्धांत सावंत यांनी आपल्यासमोर आणला आहे.

मिनाश प्रॉडक्शन प्रस्तुत आणि सिद्धांत सावंत व अशोक सावंत निर्मित ‘आठवणी’ हा चित्रपट ७ जुलैला महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल.

ट्रेलर लिंक :
https://drive.google.com/file/d/14E6dG6oSYWG-Y05MMMvuyVj-g2dyV0Bc/view?usp=drive_link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button