मुरकुटे पती-पत्नीविरुध्द गुन्हा दाखल करा महाराष्ट्र नाभिक मंडळ श्रीरामपूर शाखेची मागणी

विलास तुपे/राजूर प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी खुर्द येथील शेतीच्या वादाच्या कारणावरून भेर्डापूर येथील कलंके पिता-पुत्रांना जी गुंडांकरवी मारहाण करण्यात आली. या प्रकरणाशी ज्यांचा सहभाग आहे आणि ज्यांच्यासमोर मारहाण करण्यात आली त्या वंदना मुरकुटे व ज्ञानेश्वर मुरकुटे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नाभिक मंडळ श्रीरामपूर शाखेच्यावतीने श्रीरामपूर विभाग पोलीस उपअधीक्षक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. आहे.
तालुक्यातील भेर्डापूर येथील उदय कलंके व त्यांचे वडील रवींद्र कलंके यांना शेतीच्या वादावरून गुंडांनी बेदम मारहाण केली . सदरील घटनेचा निषेध व्यक्त करीत याबाबतची फिर्याद पोलीस स्टेशनला दिली असता फिर्यादीतील आरोपी वंदना मुरकुटे व त्यांचे पती ज्ञानेश्वर मुरकुटे यांचा प्रत्यक्ष सहभाग असून देखील त्यांना पोलीस प्रशासनाकडून जाणिवपूर्वक आरोपी केले नाही. मुरकुटे कुटुंबीय राजकीय क्षेत्रातील मातब्बर असून श्री. कलंके कुटुंबियांना त्यांच्यापासून भीती निर्माण झालेली आहे. त्यांच्या कुटुंबियांचा जीव धोक्यात आलेला आहे. मुरकुटे दाम्पत्यापासून त्यांच्या कुटुंबियांना धोका निर्माण होणार असल्याने वंदना मुरकुटे व ज्ञानेश्वर मुरकुटे यांचेवर देखील गुन्हादाखल करून कलके कुटुंबियांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली या निवेदनावर महाराष्ट्र नाभिक मंडळ श्रीरामपूर उदय रविंद्र कलंके, स्वप्नील कुलके, राजेंद्र कलंके, दिलीप कलंके, कैलास भागवत, बाळासाहेब वाघचौरे, विजय शेजूळ, बाळासाहेब कणसे, बाबा आहेर, विजय निकम, सचिन खजिनकर, निखिल वाघचौरे, कल्पना वैद्य, केशव वाघ, पांडुरंग वाघमारे, चांगदेवराव जाधव, गणेश ताकपेरे, सुभाष महाले, अमोल तूपे, चंद्रशेखर वाघ, पोपटराव वाघचौरे, केतन कलके, विठ्ठल तुवर, अण्णासाहेब कांदळकर, शिवाजी-पानसरे आदींच्या सह्या आहेत,.