कोविड काळातील शहीद प्रकाशदुतांचे पणत्या लावून केले स्मरण.

पुणे दि 23
कोरोना काळात राज्यातील सर्व अत्यावश्यक सेवा सर्व वृत्तांचे कव्हरेज करणारे TV मीडिया / वृत्तपत्र कार्यालये , कारखाने, संरक्षण ऊद्योगातील कारखाने, हॉस्पिटल,मेडिकल, लॅबोरेटरीज मेडिकल, सर्व अत्यावश्यक , कारखाने, औषधी सेवांची दुकाने,शासन व पोलीस यंत्रणा विविध अत्यावश्यक उद्योग आणि सर्व नागरिकांना वीज आवश्यक होती.
कोरोना काळामध्ये २४×७ अखंडित वीजपुरवठा करण्यात मोलाचा वाटा असलेले महावितरण महापारेषण महानिर्मिती कंपनीतील अनेक अधिकारी, कायम कामगार, तसेच तिन्ही कंपनीतील नियमित रिक्त पदाच्या जागेवर कार्यरत असलेले सुमारे 70 कंत्राटी कामगार हे कोरोना काळामध्ये कर्तव्यावर जनतेला वीज सेवा देताना शहीद झाले.
या वेळी संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, उपमहामंत्री राहूल बोडके, कार्याध्यक्ष उमेश आणेराव, कोषाध्यक्ष सागर पवार, भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण पुणे झोन अध्यक्ष सुमित कांबळे,व सचिव निखिल टेकवडे व तुकाराम वाल्हेकर इत्यादी उपस्थित होते.
पुणे महावितरण प्रादेशिक संचालक विभाग प्रकाश भवन सेनापती बापट रोड पुणे येथे उद्या रविवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ठीक ६ वाजता हा कार्यक्रम आयोजित केलेला होता .
