इतर

माजी मंत्री मधुकर पिचड यांचेवर उपचार करणाऱ्या डॉ भांडकोळी दाम्पत्याचा सन्मान!

अकोले प्रतिनिधी :

     डॉकटर तुम्ही देवासारखे धावले साहेबां वर उपचार केले आणि लगेच मुंबईला लीलावती मध्ये उपचारासाठी दाखल केल्याने त्यांच्या जीवावरच संकट टळले काल सकाळी तालुक्यातील आदिवासी भागातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत डॉ. एम के   भांडकोळी,डॉ.ज्योती भांडकोळी,माऊली आरोटे ,बिरबल वाकचौरे यांना भेटून  त्यांचा सन्मान करून आपल्या भावना व्यक्त केल्या.!

, दि. ३ऑक्टोबर रोजी माजी मंत्री मधुकरराव पिचड मॉर्निंग वॉक  करत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले.माजी आमदार वैभवराव पिचड यांनी तात्काळ.डॉ एम के भांडकोळी,डॉ.गोडगे यांना पाचारण करून उपचार सुरू केले. मात्र क्रिटिकल Security असल्याने सर्व डॉक्टरांनी तातडीने लीलावती रुग्णालयात हलविण्यात यावे सांगितले.

       त्याप्रमाणे कॉर्डिया रुग्णवाहिका बोलावून मुंबईला हलविण्यात आले .मात्र डॉ.भांडकोळी हे स्वतः श्री पिचड यांच्या सोबत तसेच माऊली आरोटे,बिरबल वाकचौरे यांनी मेहनत घेऊन मुंबई येथे पोहचवले .त्यामुळे जीवावर आलेले विघ्न  डॉकटर यांच्या प्रयत्नामुळे टळले.

     तालुक्यातील कार्यकर्ते साहेबाच्या भेटीला गेले असता माजी मंत्री पिचड यांनी डॉकटर नसते तर मी वाचलो नसतो असे भावनिक उद्गार काढताच सी.बी.भांगरे,सुरेश भांगरे,शंभू नेहे,अनंत घाणे,सुरेश गभाले ,तुकाराम खाडे,देविदास शेलार, यांनी साहेबांच्या भेटीनंतर आज सकाळी डॉ.भांडकोळी यांच्या रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेऊन सन्मान करत आभार मानले .

  • माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची प्रकृती बिघडल्याने वैभव भाऊ यांनी डॉ.भांड कोळी याना बोलावून घेऊन  उपचार केले मात्र साहेबांची प्रकृती खालवल्याने  त्यांना मुंबई येथे वेळेत हलविण्यात आल्याने साहेबांची प्रकृती स्थिर आहे.
  • शंभू नेहे,युवा कार्यकर्ते
  •   अकोले तालुक्याला लाभलेले नेतृत्व  माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची प्रकृती स्थिर करण्याचे काम आदिवासी पुत्र डॉ.भांडकोळी यांनी केले असून  त्यांचे आभार मानणे आमचे कर्तव्य आहे.त्यांचे काम म्हणजे कर्मण्या वाधिकरस्ते मोठी फलेशु  कदाचन.. असेच आहे.
  • सी बी भांगरे (माजी मुख्याध्यापक)

मी माझे कर्तव्य पार पाडले श्री पिचड यांच्या प्रकृती बाबत मला शंका आल्याने त्यांना तातडीने मुंबई येथे हलविण्यात आले.सर्वसामान्य गरीब व्यक्तींना केलेली मदत व त्यांचे आशीर्वाद श्री पिचड यांची प्रकृती स्थिर करण्यास उपयोगी आले.

डॉ.एम के भांडकोळी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button