साखर निर्यातीतून देशाला 35 हजार कोटींची परकीय चलन– अजितदादा पवार

मी सहकारी संस्थांचा पाठीराखा!
अकोले प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या 29 व्या गळीत हंगामाचा व आसवानी प्रकल्पाचा आज कारखाना स्थळावर शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार डॉ. किरण लहामटे हे होते
येणारा दिवाळीचा सण सुखाचा समृद्धीचा आनंदाचा भरभराटीचा जावो अशा प्रकारच्या शुभेच्छा देत अजित दादा यावेळी म्हणाले की
मी सहकारी साखर कारखान्यावर अनेक वर्षे पासून काम करतो त्यावेळेस पासून सहकारी साखर कारखानदारीचे माझा संबंध आहे मी सहकारी संस्थांचा पाठीराखा आहे

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना विलासराव देशमुख यांनी सांगितले होते की। इथून पुढं राज्यांमध्ये आपण सहकारी साखर कारखान्याला भागभांडवल देणार नाही महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ही गरज भागवली जाईल एवढी ताकद आपल्या सहकारी साखर कारखानदारीच्या मध्ये आलेली आहे आणि त्यामुळे आता सहकारी संस्थांचे नवीन कारखाने काढण्याची गरज नाही त्या दिवसापासून नवीन सहकारी साखर कारखाने होऊ शकले नाही त्यानंतर सहकारी साखर कारखाना परवानगीच बंद झाली कालानुरूप शेतकऱ्यांनी एकत्र येऊन खाजगी कारखाने सुरू करायला सुरुवात केली
मधल्या काळात जास्त ऊस उत्पादना ने गळीतच प्रश्न निर्माण झाला पण उद्धव ठाकरे सरकारनं मध्ये असताना आम्ही सर्व उसाचे गाळप झाले पाहीजे ही भूमिका घेतली प्रसंगी कारखान्यांना तोटा सहन करावा लागला पण शेतकऱ्यांचे उसाचे गाळप पूर्ण केले
अगस्ती मध्ये पगारावर 25 कोटी 39 लाख रुपये वर्षाचा खर्च आहे इतर कारखान्याचे तुलनेत तो अतिशय जादा आहे हा कमी केला पाहिजे कारखाण्याचे 38 कर्मचारी मागच्या चेअरमच्या घरी कामाला होते ही बाब बरोबर नाही असे मी कधी केले नाही असे म्हणत दादांनी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना चिमटा घेतला

यंदाही प्रचंड साखरेचे उत्पादन होणार आहे
नुसत्या साखर उत्पादनावर कारखाने चालविणे आता शक्य नाही कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीकडे लक्ष द्यावे
कारखाना चालविताना सर्व बाजूने बाजूने काळजी घेतली पाहिजे संचालक गे सभासदांचे विश्वस्त आहे त्यांनी विश्वस्थानप्रमाणे काम करावे
मी तुम्हाला खरच सांगतो साखर कारखाना चालवने म्हणजे काही येरागबाळ्याचं काम नाही पुढारपण करणं वेगळं साखर कारखाना चालवणं फरक आहे राजकारण आणि कारखाना हे दोन्ही वेगवेगळे आहे
हे सर्व समजून घेतले तर तुम्ही परत संचालक पद नको असे म्हणाल अशी टिपन्नी करत दादा म्हणाले की
सर्वात मोठा विश्वास आदिवासी बिगर आदिवासी सभासदांनी संचालक मंडळा वर टाकला आहे समोरच्या मंडळाचा सभासदांनी पूर्णपणे पराभव केला आहे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक बोर्डामध्ये एकोपा असला पाहिजे एखादा निर्णय घेतला तर दुसऱ्याने नीट समजून घेतला पाहिजे पांहिजे तुमच्यात दुफळी करणारे समोर आहेच
21 लोकांना काहीतरी त्रास कसा होईल अडचणी कशा वाढतील त्याबद्दलचा प्रयत्न केला जाईल जागृतपणे पावलं उचलावी लागतील
कार्य क्षेत्रातील 2लाख 90 हजार मे टना व्यतिरिक्त आजूबाजूच्या भागात जिथे कुठे तुमच्या ओळखीचे असतील आणि त्यांच्याकडे जास्त असेल तर तो ऊस कारखान्याला आणून गाळप पूर्ण करावे
या सगळ्या कामकाजावर मी लक्ष ठेवणारे आहे
कारखान्यांमध्ये राजकीय जोडे बाहेर काढूनच काम करावे हा राष्ट्रवादीचा ,काँग्रेसचा , शेतकरी संघटनेचा भारतीय कम्युनिस्ट पार्टीच् हे चालणार नाही कारखान्यात तुम्ही ज्या ठिकाणी ज्या कुठल्या पक्षात असाल तरी असेल तरी कारखाना मध्ये गेल्यानंतर तुम्ही सगळेजण विश्वस्त आणि सभासदांचे त्याची सोडवणूक करण्याच्या करता आपल्याला काय करावे लागणारे या पद्धतीने आपण सगळ्यांनी कामाच्या ठिकाणी काम करावं लागेल आणि तशा पद्धतीने काम केलं तरच आपल्याला उत्तम पद्धतीनं कारखाना चालविता येईल

साखर निर्यातीतून देशाला 35 हजार कोटी रुपयांचे परकीय चलन मिळते या वर्षी प्रचंड साखरेचे उत्पादन होणार आहे केंद्राने निर्यातीबाबत योग्य निर्णय घेतला पाहिजे असे त्व म्हणाले
सध्या महागाई आणि बेरोजगारी ने महाराष्ट्रातला तरुण-तरुणी सगळे त्रस्त होऊन गेलेले आहे सर्वसामान्य माणूस त्रासून गेलेला आहे त्याकरता आपल्याला सगळ्यांना यापुढे काम करायचे आहे ते काम करण्याच्या करता आम्ही कोठेही कमी पडणार नाही याबद्दलचा विश्वास। राज्याचे विरोधी पक्षनेते आजीत पवार यांनी व्यक्त केला
कर्ज जरूर असले पाहिजे मात्र पाच ते
ते सात वर्षात त्याची परत फेड झाली पाहिजे असे सांगत अगस्तीच्या नवं निर्वाचित संचालक बोर्डाने काटकसरीने काम करावे आणि कारखाना कर्ज मुक्त करून महाराष्ट्रात एक नवा आदर्श उभा करावा असेअजित दादा म्हणाले
याप्रसंगी आमदार डॉ किरण लहामटे , कारखान्याचे चेअरमन सीताराम पा गायकर व्हाईस चेअरमन अशोकराव भांगरे मधुकरराव।नवले आदींचे भाषणे झाले
यावेळी माजी आमदार भानुदास मुरकुटे ,चंद्रशेखर घुले पाटील ,जिल्हा बँकेचे व्हा चेअरमन माधवराव कानवडे प्रशांत गायकवाड,अमित भांगरे संदीप वरपे ,कारभारी उगले ,मधुकर नवले , डॉ. अजित नवले , कैलास वाकचौरे,,यमाजी लहामटे, कपिल पवार ,विजयराव वाकचौरे , विक्रम नवले मच्छिन्द्र धुमाळ, मारुती मेंगाळ,परबत नाईकवाडी, दादा पाटील वाकचौरे, सुशांत आरोटे ,शरद देशमुख, भानुदास तिकांडे भाऊ पाटील नवले सुरेश गडाख आदी व्यासपीठावर उपस्थित होते
कार्यक्रमांचे सूत्र संचालन सयाजीराव पोखरकर यांनी केले ते संचालक मिनानाथ पांडे यांनी आभार मानले