१ नोव्हेंबर ला अकोल्यात भव्य सत्संग मेळावा

गुरुपुत्र चंद्रकांतदादा मोरे यांचे अमृततुल्य हितगूज
अकोले प्रतिनिधी-
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ,त्रंबकेश्वर चे गुरुपुत्र चंद्रकांत दादा मोरे यांचे अमृत तुल्य हितगुज व सत्संग भव्य सोहळ्याचे आयोजन मंगळवार दि.१ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता विठ्ठल लॉन्स,देवठाण रोड, अकोले येथे करण्यात आला असल्याची माहिती केंद्राचे प्रतिनिधी संजय हुजबंद यांनी दिली.
ते पूढे म्हणाले की, हा सत्संग भव्य मेळावा अकोले तालुक्यातील श्री स्वामी समर्थ केंद्रांच्या वतीने आयोजित केलेला असून यावेळी कोरोना एकल महिला भगिनींसाठी भाऊबीज सोहळा, अहमदनगर येथील स्नेहालयातील अनाथ बालकांना वस्त्रदान, अन्नदान व शालेय साहित्य वाटप चंद्रकांतदादा मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
तरी सर्व नागरिकांनी व सेवेकरी बंधू भगिनींनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र अकोले तालुका यांच्या वतीने करण्यात आले.