इतर

रोटरॅक्ट क्लब पंचवटी फार्मसी महाविद्यायाचा पदग्रहण सोहळा उत्साहात

नाशिक : रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित रोटरॅक्ट क्लब पंचवटी फार्मसी महाविद्यायाचा पदग्रहण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. 

यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष प्रफुल बरडिया, सचिव ओमप्रकाश रावत, रोटरॅक्ट संचालक निलेश सोनजे, प्रोग्राम कमिटी प्रमुख शिल्पा पारख आदी उपस्थित होते.

कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून  शिवछत्रपती पुरस्कार, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, रेस ॲक्रॉस अमेरिका विजेते डॉ. महेंद्र महाजन यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. तसेच  काश्मिर ते कन्याकुमारी सायकल प्रवास करत त्यांनी सामाजिक बांधिलकी उपक्रम व्यसनमुक्ती,  हृदय विकाराच्या झटक्यानंतर रुग्णास प्राण वाचवण्यासाठीचे सीपीआर प्रशिक्षणही विद्यार्थ्याना दिले.

याप्रसंगी अध्यक्ष प्रफुल्ल बरडिया यांनी विद्यार्थ्याना रोटरी विषयक माहिती दिली. निलेश सोनजे यांनी रोटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध कौशल्य, नेतृत्व विकास, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संरक्षण, रक्तदान, वाहतूक नियम जनजागृती असे उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.

महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे उपसचिव व्हि. एस. मोरे यांनीही विद्यर्थ्याना शैक्षणिक प्रगती बरोबरच रोटरी क्लब ऑफ नाशिकचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असल्याचे नमूद केले. रोटरॅक्टच्या नूतन पदाधिकारी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. गत वर्षीच्या मावळत्या पदाधिकऱ्यांकडून नूतनपदाधिकऱ्यानी पदभार स्वीकारला. प्राचार्य आर. एस. भांभर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. वृषाली बैसाने यांनी उपस्थितांचे आभार मानले.

नूतनपदाधिकारीपुढीलप्रमाणे – आयपीपी श्रद्धा कारंडे, अध्यक्ष प्रांजल पवार, उपाध्यक्ष साक्षी पवार, सचिव सौरभ पोंडकुळे, खजिनदार मयुरी शिकारे, सार्जंट ॲट आर्मस सांची सदाफुले, संचालक प्रकल्प युक्ता नागरे, संचालक सोशल मीडिया वेदांत धात्रक, संचालक सभासद वृध्दी गौरी शेलार, संचालक क्लब सर्व्हिस स्मिता पाटील,संचालक  कमयुनिटि सर्व्हिस साक्षी धुमाळ, संचालक, संचालक  प्रोफेशनल सर्व्हिस हर्षदीप पुंड, संचालक इंटरनॅशनल सर्व्हिस हर्ष बोथरा यांचा पदग्रहण समारंभ पार पडला. नूतन पदाधिकऱ्यांचे मधुरा ट्रस्टच्या संचालिका संपदा हिरे, महात्मा गांधी विद्यामंदिरचे विश्वस्त डॉ. व्ही. एस. मोरे, डॉ. राजेश शिंदे महाविद्यालय विकास समिती प्रमुख डॉ. जितेंद्र नेहेते आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button