आबासाहेब काकडे विद्यालयात स्वर्गीय निर्मलाताई काकडे यांना अभिवादन

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
आबासाहेब काकडे विद्यालय शेवगाव या ठिकाणी आज विद्यालयाच्या संस्थापक मुख्याध्यापिका स्वर्गीय निर्मलाताई काकडे यांना ९५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते, उपप्राचार्या श्रीमती रूपा खेडकर ,कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून उपमुख्याध्यापिका सौ . मंदाकिनी भालसिंग, पर्यवेक्षिका पुष्पलता गरुड, पर्यवेक्षक सुनील आव्हाड, प्रा . शिवाजी पोटभरे ,श्री ए. पी .सोनवणे सर आदि मान्यवर उपस्थित होते .
यावेळी स्वर्गीय निर्मलाताई काकडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुमारी ज्ञानेश्वरी झिरपे व सुनील चव्हाण यांनी निर्मलाताईंविषयी आपले मनोगत व्यक्त केले .
शिक्षक प्रतिनिधी ए .पी . सोनवणे सर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सामान्य माणसे वर्तमानात जगतात तर असामान्य माणसे भविष्याचा वेध घेतात . स्वर्गीय निर्मलाताई देखील त्यापैकीच एक होत्या .त्यांनी गोरगरिबांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचे काम केले असे सांगितले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षा उपमुख्याध्यापिका सौ . मंदाकिनी भालसिंग यांनी स्वर्गीय निर्मलाताई काकडे यांचा संपूर्ण जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला .स्वर्गीय निर्मलाताई या अत्यंत शिस्तीच्या व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या मुख्याध्यापिका होत्या , त्यांनी वस्तीगृहांमधील मुलांचा स्वतःच्या मुलाप्रमाणेच सांभाळ केला व त्यांचे भविष्य घडवले असे सांगितले .सर्व विद्यार्थ्यांनी निर्मलाताई यांच्या जीवनावर आधारित लेक सावित्रीचे हे पुस्तक वाचावे असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.
सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक पर्यवेक्षिका श्रीमती पुष्पलता गरुड यांनी तर सूत्रसंचलन ज्ञानेश्वर गरड यांनी केली. ज्ञानेश्वर लबडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.