आकाश कंदील बनवा.. जिंका सेमी पैठणी साड्या’.. निकाल – जाहीर

.
सेमी पैठणी साड्यांचे विजेत्या ठरल्या
श्रेया मोरे, गितांजली दिड्डी, वेदश्री संत…
सोलापूर दि ३१ सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित, पद्मशाली सखी संघमच्या वतीने गेल्या तीन – चार महिन्यांपासून महिलांच्या उन्नतीसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. त्याच अनुषंगाने यंदाच्या दिपावली निमित्ताने फक्त महिला वर्गासाठी ‘बनवा आकाश कंदील.. जिंका सेमी पैठणी साड्या’.. अशी राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यभरातून जवळपास चाळीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
दाजीपेठ येथील श्रीराम मंदिर येथे झालेल्या
या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी स्त्रीरोगतज्ञ डॉ. सौ. शिवकांची चिप्पा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्या म्हणाल्या, ‘महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारातील उपक्रम राबविण्यात यावेत. त्यामुळे महिलांना नक्कीच प्रेरणा मिळून त्या सिध्द करतील’. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षा सौ. माधवी अंदे या होत्या. प्रारंभी पद्मशाली समाजाचे कुलदैवत चिरंजीव महर्षी मार्कंडेय महामुनींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. निकालाबाबत स्पर्धक महिलांमध्ये उत्कंठा वाढली होती. निकाल घोषित करुन पारितोषिके डॉ. सौ. शिवकांची चिप्पा यांच्या हस्ते वितरण करण्यात आले होते. साड्या पाहून अनेक स्पर्धक महिलांना खूपच आवडल्या. म्हणाल्या, भविष्यात सखी संघमच्या वतीने आयोजित स्पर्धेत नक्कीच सहभाग घेऊ. सोलापूरातील चाटला पैठणी सेंटर तर्फे हे पारितोषिके देण्यात आले. श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आणि पारितोषिक वितरण सोहळा करण्यात आला.
प्रथम क्रमांकाचे पारितोषिक माळशिरसच्या कु. श्रेया वसंत मोरे हिने पटकावला, सोलापूर शहरातील सौ. गितांजली नितीन दिड्डी यांनी द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिक पटकाविल्या तर, पंढरपूरच्या कु.वेदश्री प्रसाद संत हिने तृतीय क्रमांक पटकावला. परिक्षक म्हणून हरीप्रसाद बंडी सर यांनी काम पाहिले, सचिवा सौ. ममता मुदगुंडी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केल्या तर, आभार प्रदर्शन सौ. ममता तलकोकूल यांनी केले. श्रीराम मंदिराचे विश्वस्त दयानंद कोंडाबत्तीनी आणि फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती यांचे सहकार्य लाभले.
——————————-