नर्मदा परिक्रमेमुळे आध्यात्मिक ऊर्जा मिळते- बाबासाहेब जाधव

नेप्ती ग्रामस्थांतर्फे नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल सन्मान ,
अहिल्यानगर : नगर तालुक्यातील नेप्ती येथील नंदनवन उद्योग समूहाचे संचालक बाबासाहेब भाऊसाहेब जाधव वय ६५ वर्ष यांनी व गोपाळ दास, अशोक ठाणगे, मीनाताई सत्रे ,मंदाताई हजारे यांनी चार महिने खडतर पायी प्रवास करत नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल त्यांचा नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करून सत्कार करण्यात आला
मनात एखादी गोष्ट करायचीच असा आत्मविश्वास व जिद्द जर असेल तर अशक्यप्राय वाटणारी गोष्ट सुध्दा शक्य होते. याचेच एक मुर्तीमंत उदाहरण हे आहे. नर्मदा परिक्रमा पुर्ण करण्यासाठीचा पायी प्रवास यांनी चार महिन्यापुर्वी सुरू केला.
उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता भक्तीरसात न्हाऊन गेलेल्या यांनी मध्यप्रदेश, महाराष्ट (नंदूरबार), गुजरात व छत्तीसगड या चार राज्यातून वाहणाऱ्या नर्मदा नदीच्या परिक्रमेला सुरूवात केली. जंगल, दरी, डोंगर असा खडतर प्रवास करून पुष्पदंतेश्वर, मनी नागेश्वर, गायत्री मंदीर, हरसिध्दी माता, जलाराम आश्रम, कुंभेश्वर, शुलपानेश्वर, हनुमंतेश्वर अशा तीर्थक्षेत्राचे दर्शन घेत प्रवास पुर्ण करत ओंकारेश्वर येथे येवून ही यात्रा पूर्ण झाली. त्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करून सत्कार करण्यात आला.

नर्मदा मैयाच्या कृपेने खूप मोठे पायी अंतर चाललो. चार महिने कुटुंबाला सोडून संन्याशी जीवन जगलो. सर्व कुटुंबीयांच्या सहकार्याने नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. या परिक्रमेत वेगवेगळ्या तीर्थाचे दर्शन होते. .नर्मदा ही भगवान शंकराची कन्या आहे .सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी म्हणून गंगेचे महत्व असले तरी फक्त नर्मदा नदीची परिक्रमा होते .नर्मदेचे धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे. नर्मदा परिक्रमामुळे अध्यात्मिक ऊर्जा व आत्मिक समाधान मिळते असे प्रतिपादन नंदनवन उद्योग समूहाचे संचालक बाबासाहेब जाधव यांनी केले .
यावेळी माजी सरपंच अंबादास पुंड, दिलीप होळकर, पाराजी होळकर, आबासाहेब कांडेकर हमीदपूर , समता परिषदेचे तालुकाध्यक्ष रामदास फुले ,शाखा अध्यक्ष शाहूराजे होले, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पुंड, प्रा. भाऊसाहेब पुंड ,सौरभ भुजबळ ,शुभम कोल्हे ,मुकेश इहरे ,शितल जाधव, पुनम जाधव, ,चेअरमन विलास जपकर, भानुदास फुले, बाळासाहेब बेल्हेकर, विनायक बेल्हेकर, अशोक गवळी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.