इतर
कोतुळ येथे शासनाचा आनंदाचा शिधा वाटप

कोतुळ /प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ येथें स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाचे वतीने आनंदाचा शिधा रेशन कार्डधारकांना वाटप करण्यात आला
हा शिधा घेण्यासाठी कोतुळ येथे कालिका माता महिला संस्थेच्या स्वस्त धान्य दुकानात शिधा घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती
या मध्ये एक किलो चनाडाळ,एक किलो रवा, एक किलो साखर व एक लिटर तेल. अशा वस्तू शंभर रुपयांत रेशन कार्डधारकांना वाटप करण्यात आले.
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम पाटील देशमुख जिल्हा परिषद सदस्य रमेश काका देशमुख उपसरपंच संजय देशमुख, तिळवण तेली समाजाचे युवा कार्यकर्ते चंद्रकांत घाटकर बापूसाहेब देशमुख गोरख देशमुख, शंकर बेळे विजय बेळे जेष्ठ नागरिक रामनाथ गीते ,लक्ष्मण गीते ,स्वस्त धान्य दुकान व्यवस्थापक अण्णासाहेब कडलग आदी उपस्थित होते
