शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे लवकर करा : सभापती काशिनाथ दाते

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
मळगंगा मिल्क अँड ॶॅग्रो प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड निघोज संचालित म्हसोबाझाप येथील उद्योजक जयसिंग आग्रे यांनी सुरू केलेल्या म्हसोबाझाप येथे नूतन शाखेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी बोलताना सभापती काशिनाथ दाते सर म्हणाले, कन्हैया उद्योग समूहाचा म्हसोबाझाप येथे हा मळगंगा मिल्क ॶॅण्ड प्रोडक्ट उद्योग उभा करून त्याचा फायदा परिसरातील पोखरी, वारणवाडी, म्हसोबाझाप व पळसपुर येथील शेतकऱ्यांना होणार असून या परिसरात या प्लान्ट मुळे दूध धंद्यास चालना मिळणार आहे. आज शेतकरी प्रचंड अडचणीत आहे तालुक्यात अति पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहेत. आजही काही शेतकऱ्यांची पिके पाण्यात असून त्यांचे तातडीने पंचनामे करणे गरजेचे आहे. तालुका प्रशासनाकडून याची योग्य ती दखल घेतली जात नाही. काही गावांचे पंचनामे अजूनही झाले नसल्याच्या तक्रारी आले आहेत. तहसील प्रशासनाने झालेले नुकसानीची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर पंचनामे करण्याची मागणी सभापती दाते यांनी केली. पाच हजार लिटर संकलन करून ते चिल्ड करण्याची क्षमता असलेला प्लांट जयसिंग आग्रे यांनी उभारला असून त्यांचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आज त्यांच्याकडे साडेचार हजार लिटर दूध पोखरी परिसरातून कलेक्शन होत आहे.
यावेळी प्लान्टचे टेक्निकल टायरेक्टर प्रताप उबाळे, प्रोकृमेंट मॅनेजर अरविंद बांदल, पठारे साहेब, वारणवाडी सरपंच संतोष मोरे, पोखरी सरपंच सतिष पवार, माजी चेअरमन अण्णासाहेब पवार, भाऊसाहेब आहेर, साहेबराव रोकडे, रंगनाथ दाते, गोविंद आग्रे, नामदेव आग्रे, बंडू औटी, चेअरमन लक्ष्मण आहेर, व्हा. चेअरमन बाळू आहेर, दिनकर पवार, बाळू शिंदे, विठ्ठल आग्रे, अशोक खैरे, निलेश पवार इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते सर्वांचे आभार जयसिंग आग्रे यांनी मानले.