नांदगाव विधी सेवा समिती व वकील संघ याच्या संयुक्त विद्यमाने कायदे विषयक जनजागृती अभियान

नाशिक दि२
पॅन इंडिया अंतर्गत नांदगाव विधी सेवा समिती व वकील संघ याच्या संयुक्त विद्यमाने आज गिरणानगर ग्रामपंचायत येथें कायदे विषयक जनजागृती अभियान संपन्न झाले. नांदगाव कोर्टाचे न्यायाधीश श्री. एस.जी.दूबाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री .प्रा. सुरेश नारायणे सर पी. एल.व्ही.डॉ.गुप्ता, ॲड.विद्या कसबे, सामाजिक कार्यकर्ते सुमित सोनवणे व नांदगाव कोर्टाचे ज्यु. क्लार्क एस. ए.मोरे यांचे स्वागत सरपंच सौ.अनिता पवार यांनी केले. या प्रसंगी ॲड. पी.एस.पवार यांनी लहान मुलांसोबत मैत्रीपूर्ण संबंध व लहान मुलांचे हक्क या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.उमेशकुमार सरोदे पाटील यांनी केले.
या कार्यक्रमास गिरणांनगर चे ग्रामसेवक डॉ. गोकुळ खैरणार, सदस्य श्री सुनील सोनवणे, योगेश दळवी, सचिन आहेर ,राहुल पवार, सिद्धेश सोनवणे , सागर आहेर,अभय देशमुख,गणेश अमुक, राजू गोफने,उमेश उगले,सागर शिंदे,प्रशांत गवांदे ,संदीप भदाने, तसेच गिरणांनगर चे ग्रामस्थ व बचतगटाच्या महिला मोठया प्रमाणत उपस्थित होत्या.